भारताला २०२० मध्ये मिळाले ४० नवे अब्जाधीश

Rich-Person
Rich-Person

मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ
नवी दिल्ली - कोरोनाची महासाथ असूनही २०२० मध्ये देशात अब्जाधीशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी देशाला ४० नवे अब्जाधीश मिळाले आहेत, ज्यामुळे देशातील एकूण अब्जाधीशांची संख्या १७७ झाली आहे. ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट’च्या आकडेवारीनुसार ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे मालक मुकेश अंबानी हे देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत आणि २०२० मध्ये त्यांची संपत्ती २४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यांची एकूण मालमत्ता ६.१० लाख कोटी रुपये आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या यादीनुसार, अंबानी हे जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी यांच्यानंतर भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो. अदानी यांच्याकडे २.३५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि जगभरातील श्रीमंत लोकांमध्ये त्यांचा ४८ वा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी त्यांचे भाऊ विनोद अदानी यांची संपत्ती १२८ टक्क्यांनी वाढली असून, त्यांची एकूण मालमत्ता ७२ हजार कोटींच्या जवळपास आहे.

आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीतही १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली असून, त्यांची संपत्ती १८ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. देशातील सर्वाधिक  म्हणजेच ६० अब्जाधीश हे मुंबईत राहतात, तर ४० नवी दिल्लीत आणि २२ बंगळूरमध्ये राहतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com