महिला सहकाऱ्याला वाचवताना IAS अधिकाऱ्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 मे 2017

पोहण्याच्या तलावात पडलेल्या महिला सहकाऱ्याला वाचवताना भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : पोहण्याच्या तलावात पडलेल्या महिला सहकाऱ्याला वाचवताना भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दक्षिण दिल्लीतील बेर सरई येथील नागरी प्रशिक्षण केंद्रात सोमवारी संध्याकाळी आशिया दाहिया (वय 30) आणि त्यांचे काही मित्र एकत्र आले होते. यावेळी त्यांनी केंद्रातील पोहण्याच्या तलावात पोहण्याचे ठरवले. दरम्यान एक महिला सहकारी पाय घसरून तलावात पडली. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी दाहियासह अनेकांनी तलावात उडी घेतली. काही वेळातच महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र दाहिया हे बाहेर आले नसल्याचे लक्षात आले. काही वेळातच ते पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. दाहिया यांचे कुटुंबिय हरियानातील सोनपत येथे आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या:

वाघाच्या हल्ल्यात प्राणीसंग्रहालयातील महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

Web Title: India news delhi news new delhi ias officer death drown