हिमस्खलनामुळे दोन जवानांचा मृत्यू

indian army soldier missing due to avalanche in north sikkim
indian army soldier missing due to avalanche in north sikkim

नवी दिल्ली : उत्तर सिक्कीममधील लूगनाक परिसरात झालेल्या हिमस्खलनात भारतीय लष्करातील एका लेफ्टनंट कर्नलसह एका जवान मृत्युमुखी पडला. गस्ती आणि स्नो क्लियरन्स पथकातील १८ जवान गुरुवारी या परिसरात गस्तीवर असताना हिमस्खलन झाल्याने ते बर्फाखाली गाडले गेले होते, अशी माहिती लष्करातील अधिकाऱ्यांनी दिली.

यानंतर बचाव पथकाने हाती घेतलेल्या मोहिमेनंतर सर्वाना बाहेर काढण्यात यश मिळाले असले तरी लेफ्टनंट कर्नल रॉबर्ट टी.ए आणि सपला षण्मुख राव यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले की, जवान गस्त घालत असताना अचानक हिमस्खलनामुळे जवान गाडले गेले. पण, याबाबतची माहिती समजल्यानंतर तत्काळ जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, एक अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com