चीनला जशासतसं उत्तर मिळणार; भारतीय सैन्य युद्धजन्य स्थितीसाठी तैनात

Indian military ready for war China will get the right answer.jpg
Indian military ready for war China will get the right answer.jpg

नवी दिल्ली- पूर्व लडाखच्या गालवान भागात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील संबंध स्फोटक बनले आहेत. दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु असली तरी चीनची दुहेरी नीती पुन्हा दिसून आली आहे. चिनने शांततेची भाषा केली असली तरी गालवान खोऱ्यातून माघार घेण्यास नकार दिला आहे. 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतानेही कठोर पवित्रा घेतला असून चीन सुधारला नाही तर जशासतसं उत्तर देण्यात येईल, असं म्हटलं आहे. भारताने आपल्या शांततेच्या नीतीत बदल केला आहे. आता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून (PLA) होणाऱ्या मनमानीला चाप लावला जाईल, असं लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
15 जून रोजी झालेल्या संघर्षामुळे भारताने चीनसोबत असलेल्या 3488 किलोमीटर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. चीननेही सीमा भागात सैनिकांची आवक वाढवली आहे. विशेष करुन गालवान खोरे, दौलत बेग ओल्डी, देपसान्ग, चुशुल आणि पूर्व लडाखच्या इतर क्षेत्रामध्ये भारतीय सैन्य हायअलर्टवर आहे. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही(LAC) सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. पूर्व लडाखमध्ये जवळपास 15 हजार सैन्य तैनात आहे. तसेच त्यापेक्षा अधिक सैन्य त्यांच्या मागे उभे ठाकले आहे. 

भारतीय सैन्य आता मागे घटणार नाही. क्षेत्राच्या सार्वभौमत्वावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. चीनने यापूर्वीही अनेकवेळा आक्रमकता दाखवली आहे. भारतीय क्षेत्रात येणे, त्या क्षेत्रावर दावा सांगणे हे नित्याचे झाले आहे. मात्र, यावेळी असं होणार नाही. चिनी सैनिकांच्या प्रदेश बळकावण्याच्या प्रत्येक प्रयत्नांना हाणून पाडले जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
चीनचे दुटप्पी राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत चीन विरोधात ताठर भूमिका घेतल्याचं सांगण्यात येत आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे भारतही आपली रणनीती बदलण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी बुधवारी याचेच संकेत दिले आहेत. आम्ही कुणाला डिवचायला जात नाही. मात्र, आमची सार्वभौमत्वता आणि अखंडता यांना धक्का बसणार असेल तर प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही, असं ते म्हणाले होते.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची खासियत तुम्हाला माहितीये का?
 

चिनी सैनिकांनी अनेकवेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी केली आहे. जून 2017 मध्ये डोकलाममध्येही चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. तेव्हापासून चीनची हिंमत वाढली आहे. चीनने गालवान  खोरे आणि सिक्कमधील नाकू ला सेक्टरमध्येही आक्रमक धोरण अवलंबलं आहे.
राज्यातील सहा जिल्ह्यांत झालेल्या ‘सिरो सर्व्हे’चा निष्कर्ष पहा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com