लोकसंख्येत स्थैर्य! भारतातील प्रजननाचा दर आला 2.2च्याही खाली: NFHS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Population

लोकसंख्येत स्थैर्य! भारतातील प्रजननाचा दर आला 2.2च्याही खाली: NFHS

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतातील एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate - TFR) जवळपास दोनच्या आसपास पोहोचला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण -5 (National Family Health Survey-5) मधील डाटा सांगतो की, 2016 मध्ये TFR हा 2.2 वर होता. जो आता कमी होऊन दोनवर आला आहे. म्हणजेच सरासरी एका महिलेने आपल्या आयुष्यभरात मुलांना जन्म देण्याचे प्रमाण 2.2 वरुन दोनवर आले आहे. याचा अर्थ असा आहे की, देशातील लोकसंख्या आता जवळपास स्थिर होत आहे. म्हणजेच त्यातील वाढ ही खूपच साधारण आहे.

हेही वाचा: एसटी संप मिटणार? सायंकाळी सहा वाजता अनिल परब करणार मोठी घोषणा

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण - 5 च्या दुसऱ्या टप्प्यातील आकडेवारीनुसार, गर्भनिरोधक प्रसार दर म्हणजेच Contraceptive Prevalence Rate (CPR) आता 54 टक्क्यांवरुन वाढून 67 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज बुधवारी हे आकडे जाहीर केले आहे. या आकडेवरुन असा संकेत मिळतो आहे की, आता भारताची लोकसंख्या स्थिरतेकडे निघाली आहे. 2015 आणि 2016 च्या दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये TFR हा राष्ट्रीय स्तरावर 2.2 होता. पाचवा सर्व्हे हा 2019 पासून 2021 च्या दरम्यान केला गेला. यामध्ये प्रजनन दर कमी झालेला आढळून आला आहे.

हेही वाचा: ST STRIKE: विलिनीकरणाला नकार, पण भरघोस पगारवाढीचा प्रस्ताव

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी म्हटलंय की, NFHS-5 वरुन लक्षात येतं की, शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्याच्या दिशेमध्ये गती आलेली आहे. फेज दोनमध्ये अरुणाचल प्रदेश, चंडीगड, छत्तीसगढ, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

loading image
go to top