असे काय घडले! भारताची मान शरमेने पुन्हा खाली गेली

उज्ज्वलकुमार
बुधवार, 4 डिसेंबर 2019

राजस्थानात अत्याचार; एकाला अटक
कोटा - अल्पवयीन नातलग मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एकाला अटक करण्यात आली आहे. ही मुलगी इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी असून, तिला आई नाही. वडील आणि आजीबरोबर ती राहते. तिच्या घरातील माणसे झोपली असताना गुन्हेगाराने तिच्यावर अत्याचार केला आणि ही घटना कोणाला न सांगण्याबाबत दमदाटी केली. मात्र, मुलीने तिच्या शिक्षिकांना हा प्रकार सांगितल्यावर पोलिसांकडे तक्रार करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने यापूर्वीही अत्याचार केल्याचे मुलीने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ‘पोक्‍सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पाटणा - महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची भाषा सुरू असताना बिहारमध्ये एका मुलीवर अत्याचार करून, तिला गोळी घालून जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. बक्‍सर जिल्ह्यातील कुकुधा या गावात हा प्रकार घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

हैदराबादमध्ये एका पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्याच्या घटनेला एक आठवडा होण्यापूर्वीच बिहारमध्येही असा प्रकार घडला आहे. कुकुधामधील या मुलीचा कंबरेच्यावर जळालेला देह इताधी ठाण्याच्या पोलिसांना आज पहाटे एका पडिक शेतात आढळल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सतीश कुमार यांनी दिली. या मुलीवर अत्याचार झाल्याचा आणि ही घटना सोमवारी मध्यरात्रीनंतर घडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ही मुलगी अल्पवयीन होती की नाही, याचा उलागडा शवविच्छेदनानंतर होईल, असे ते म्हणाले. 

'निर्भया'च्या दोषींना फासावर लटकविण्यासाठी कारागृहात जल्लादच नाही'

या मुलीचे अपहरण करून गुन्हेगारांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि नंतर तिला गोळी घालून ठार केल्याचा आणि नंतर जाळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या मुलीच्या कपाळावर गोळी घुसल्याची खूण आहे आणि गोळीचे रिकामे काडतूसही सापडले आहे. या मुलीचा चेहरा पूर्ण जळालेला असल्याने तिची ओळख पटू शकलेली नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी बक्‍सरचे पोलिस अधीक्षक उपेंद्र नाथ वर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

गुलबर्ग्यात अत्याचार करून बालिकेचा खून
गुलबर्गा - गुलबर्गा जिल्ह्यात चिंचोळी तालुक्‍यातील सोलेपेटजवळ दुसरीत शिकणाऱ्या गतिमंद बालिकेवर अत्याचार करून गळा आवळून खून केल्याची घटना आज उघडकीस आली. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

अजिबात नाही! नाही व्हायचं मला 'या' देशाची मुलगी!

मुलीला फूस लावून हा प्रकार घडला असून, अत्याचार करणाऱ्या संशयिताचे नाव यल्लाप्पा असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत त्याने या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संशयित आरोपीने मुलीला गोड बोलून बोलावून घेतले. त्यानंतर येथून गावातील अंगणवाडीकडे नेले. तेथे अत्याचार करून हत्या केल्याचे दिसते. सोलपेटे पोलिसांनी यांची चौकशी सुरू केली आहे.

ही मुलगी सोमवारी शाळेत हजर नव्हती. ती शाळेतून घरी परत आली नाही, तेव्हा पालकांनी तिचा शोध सुरू केला. घरचे लोक यल्लाप्पापर्यंत पोचल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी संशयिताला सोलपेट पोलिसांकडे सोपविले. घटनास्थळावरून मिळालेल्या वस्तूंवरून अत्याचार करून खून झाल्याचा प्रकाराला पुष्टी मिळत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias shame is down again