esakal | भडकाऊ भाषणप्रकरणात, गांधी कुटुंब अडकले; ओवैसींसह स्वरा भास्करही गोत्यात, एफआयआर दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

inflammatory speech case fir against sonia rahul and priyanka gandhi asaduddin owaisi swara bhaskar

दिल्लीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींना बजावलेल्या नोटिशीवरून काँग्रेसने संताप व्यक्त केला.

भडकाऊ भाषणप्रकरणात, गांधी कुटुंब अडकले; ओवैसींसह स्वरा भास्करही गोत्यात, एफआयआर दाखल

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली New Delhi : द्वेष पसरविणारी विधाने केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी Sonia Gandhi, राहुल गांधी Rahul Gandhi, प्रियांका गांधी Priyanka Gandhi यांच्यासह इतर काही राजकीय नेत्यांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि पोलिसांना नोटीस बजावत प्रतिक्रिया मागविली आहे. ‘लॉयर्स व्हाइस’ या स्वयंसेवी संस्थेने ही याचिका दाखल करताना राजकीय नेत्यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी व्हावी, अशीही मागणी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गांधी कुटुंबीयांबरोबरच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान, ‘एमआयएम’चे नेते अकबरुद्दीन ओवेसी आणि याच पक्षाचे माजी नेते वारिस पठाण यांच्याविरोधातही याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप करत वारिस पठाण, असदुद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी, अमानतुल्ला खान, अभिनेत्री स्वरा भास्कर, रेडिओ जॉकी सायमा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिकाही दाखल झाल्या आहेत. यापैकी एकाच याचिकेत अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा आणि कपिल मिश्रा या भाजपच्या तीन नेत्यांवरही आरोप करण्यात आले आहेत. या सर्व याचिकांवर म्हणणे मांडण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र, दिल्ली आणि पोलिसांना दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० एप्रिलला होणार आहे.

आणखी वाचा - नाणार रिफायनरीला आता भाजपनंतर 'या' पक्षाचा पाठिंबा 

नेत्यांमध्ये संताप 
दिल्लीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींना बजावलेल्या नोटिशीवरून काँग्रेसने संताप व्यक्त केला. कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, गिरिराजसिंह या भाजप नेत्यांविरुद्ध अद्याप गुन्हा का नोंदविण्यात आलेला नाही, अशी विचारणा काँग्रेसने आज केली.  काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. चिथावणीखोर भाषण करणारे कोण आहेत, हे जगजाहीर आहे. कपिल मिश्रा, प्रवेश वर्मा, अनुरागसिंह ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा का नोंदविण्यात आलेला नाही. भडक बोलणारे चिन्मयानंद , संगीत सोम यांच्यावरही कधी गुन्हा दाखल झाला नाही. त्यांची वक्तव्ये तर सोनिया, राहुल यांच्या कथित वक्तव्यांच्या तुलनेत खालच्या दर्जाची होती, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधींविरोधातील नोटिशीला सडेतोड उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा - बंगळुरात फिल्मिस्टाईल थरार, चकमकीत कुख्यात गुंडाचा खात्मा

याचिकेवर शंका 
याबाबतच्या जनहित याचिकेच्या हेतूवरही सिंघवी यांनी शंका उपस्थित केली. न्यायपालिका कोणत्याही जनहित याचिकेमध्ये नोटीस बजावत नाही. अशा याचिकेचा हेतू काय आहे, हे पाहिले जाते. या प्रकरणातील याचिकाकर्ता हे शिवराजसिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना राज्याचे महाधिवक्ता राहिलेले आहेत. त्यावरूनच याचिकेचा हेतू कळतो, असा टोलाही त्यांनी लगावला. 

पंतप्रधान मोदींनी शांततेचे आवाहन करण्यासाठी तीन दिवस का लावले आणि गृहमंत्री अमित शहा अजूनही मौन का आहेत. गृहमंत्र्यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा करणे आवश्यक होते; परंतु अजूनही त्यांनी तसे केलेले नाही. 
- कपिल सिब्बल, नेते काँग्रेस