esakal | बेटावर देशाची स्थापना करणाऱ्या स्वामी नित्यानंदला इंटरपोलची नोटीस!
sakal

बोलून बातमी शोधा

Nithyananda

इक्वाडोरला लागून असणाऱ्या बेटावरच नित्यानंद यांनी स्वत:चे वेगळे राष्ट्रच वसविल्याने ते चर्चेत आले होते. 

बेटावर देशाची स्थापना करणाऱ्या स्वामी नित्यानंदला इंटरपोलची नोटीस!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंद यांच्याविरोधात इंटरपोलने बुधवारी (ता.22) ब्लू नोटीस जारी केली आहे, बलात्कार प्रकरणातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी नित्यानंद यांनी मागील वर्षी पासपोर्टशिवाय देशातून पळ काढला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी त्यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये तक्रारदेखील नोंदविण्यात आली आहे. आता गुजरात सरकारच्या विनंतीनंतर नित्यानंद यांच्याविरोधात इंटरपोलने नोटीस बजावली आहे.

- नेताजींच्या जयंतीनिमित्त सुटी जाहीर!

सर्वसाधारपणे एखाद्या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी इंटरपोलकडून ही ब्लू नोटीस जारी केली जाते, किंवा ज्ञात तसेच अज्ञात गुन्हेगार वा गुन्हेगारी कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधातदेखील ही नोटीस जारी करण्यात येते. दरम्यान, भारतातून पळ काढल्यानंतर नित्यानंद यांनी इक्‍वाडोरमध्ये आश्रय घेतल्याचे बोलले जात होते; पण त्यांच्या दूतावासाने मात्र याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

- सुशांतच्या गर्लफ्रेंडने खास फोटो शेअर करत केलं बर्थ डे विश!

इक्वाडोरच्या सरकारनेच दक्षिण अमेरिकेतील एक छोटसे आयलंड खरेदी करण्यासाठी नित्यानंद यांना मदत केल्याचे बोलले जाते. इक्वाडोरला लागून असणाऱ्या बेटावरच नित्यानंद यांनी स्वत:चे वेगळे राष्ट्रच वसविल्याने ते चर्चेत आले होते. 

- INDvsNZ : 'गब्बर'ची जागा भरून काढण्याची जबाबदारी 'या' दोघांवर; न्यूझीलंडविरुद्ध संघ जाहीर!​

भारतातही गुन्हे 

नित्यानंद यांच्याविरोधात भारतात अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत, अपहरण, देणगीसाठी स्वत:च्या आश्रमामध्ये मुलांचा छळ करणे आदी गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. याप्रकरणीच मागील वर्षी त्यांच्याविरोधात गुजरात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नित्यानंद यांच्या अहमदाबादेतील आश्रमातून दोन मुली बेपत्ता झाल्या होत्या, त्यानंतर त्यांच्याविरोधातील कारवाईचा फास आवळला गेला होता.

loading image