नेताजींच्या जयंतीनिमित्त सुटी जाहीर!

वृत्तसंस्था
Wednesday, 22 January 2020

नेताजी जयंतीनिमित्त 2014 पर्यंत राज्यात सार्वजनिक सुटी देण्यात येत होती. मात्र, 2015 ते 2019 या काळात ही सुटी यादीतून काढण्यात आली होती.

रांची : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी, सेनानींनी लढा दिल्या. काहींनी देशात राहून तर काहींनी परदेशात राहून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या सर्वांमध्ये अग्रगणी राहिले ते नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजींची  पाच वर्षांच्या खंडानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त झारखंड सरकारने गुरुवारी (ता. 23) सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.

- CAA च्या स्थगितीस नकार; सरकारला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नेताजी जयंतीनिमित्त 2014 पर्यंत राज्यात सार्वजनिक सुटी देण्यात येत होती. मात्र, 2015 ते 2019 या काळात ही सुटी यादीतून काढण्यात आली होती. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मंगळवारी (ता.21) घेतलेल्या आढावा बैठकीत 23 जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा आदेश दिला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

- कोण आहेत यावर्षीचे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे वाचा

''झारखंड ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कर्मभूमी आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या आयुष्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे,'' असे सोरेन म्हणाले.

- लहानपणापासून एकत्र असलेले आयपीएस दाम्पत्य आता...

गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि आरजेडी यांनी आघाडीचे सरकार सत्तेवर आणले. आणि हेमंत सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 2014 ते 2019 या काळात भारतीय जनता पक्षाची या राज्यात सत्ता होती. त्यावेळी नेताजींच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी रद्द करण्यात आली होती. आता सत्ताधारी सोरेन सरकारने पुन्हा नेताजींच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: public holiday on the birth anniversary of Netaji Subhashchandra Bose announced by Jharkhand government