मुंबई-अहमदाबाद ट्रॅकवर धावणार 'तेजस एक्सप्रेस'; लवकरच प्रवाशांच्या सेवेत!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 डिसेंबर 2019

अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद यादरम्यान (गाडी क्र. 82902-82901) ही गाडी सहा दिवस धावणार आहे.

नवी दिल्ली : 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) चालविल्या जाणाऱ्या दुसऱ्या 'तेजस एक्‍स्प्रेस'चे उद्‌घाटन 17 जानेवारी 2020 रोजी होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अहमदाबाद ते मुंबई यादरम्यान देशातली ही दुसरी अतिजलद रेल्वेगाडी धावण्यास प्रारंभ होणार आहे. 19 जानेवारीपासून ही गाडी नियमितपणे या दोन शहरांदरम्यान धावणार असल्याचे महामंडळातर्फे आज सांगण्यात आले. 

- तोंडी तलाकपीडितांना आर्थिक आणि कायदेशीर मदत जाहीर!

लखनौ-दिल्ली अशी पहिली तेजस एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली असून, ती नियमितपणे धावत आहे. आता मुंबई व अहमदाबाद या दोन आर्थिक केंद्रांना जोडणारी ही दुसरी तेजस एक्‍स्प्रेस धावेल. 'प्रीमियम ट्रेन' असा तिचा दर्जा राहील. या गाडीचे बुकिंग फक्त ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. रेल्वे स्थानकांवरील किंवा रेल्वेच्या आरक्षण काउंटरवर या गाडीची तिकिटे उपलब्ध होणार नाहीत. मात्र, 'आयआरसीटीसी'च्या अधिकृत एजंटांकडे ही तिकिटे उपलब्ध होतील.

- पुण्याला तीन मंत्रिपदं? अजित पवारांचे नाव निश्चित; पालकमंत्री कोण?

प्रवाशांना 'आयआरसीटीसी'च्या वेबसाइटवर किंवा मोबाईल ऍप 'आयआरसीटीसी रेल कनेक्‍ट'मार्फत तिकिटे काढता येतील. याखेरीज पेटीएम, इक्‍सिगो, फोनपे, मेक माय ट्रिप, गुगल, इबिबो, रेलयात्री यांच्यामार्फतही तिकिटे काढणे शक्‍य होणार आहे. 

- दाऊदचा बर्थडे, डोंगरीमध्ये सेलिब्रेशन..

अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद यादरम्यान (गाडी क्र. 82902-82901) ही गाडी सहा दिवस धावणार आहे. गुरुवारी या गाडीला सुटी असेल. अत्यंत आरामदायक व अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त अशी ही गाडी असेल. सर्व उच्च दर्जाच्या सुविधा या गाडीत उपलब्ध होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IRCTC to launch Tejas Express from Ahmedabad to Mumbai on January 17