जम्मू-काश्‍मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू; पण...

वृत्तसंस्था
बुधवार, 15 जानेवारी 2020

जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने जवळपास 5 महिन्यांनंतर खोऱ्यातील काही भागांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा आणि आवश्‍यक असलेल्या आस्थापनांमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही सेवा 15 जानेवारीपासून लागू झाली असून, फक्त सात दिवसांपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने जवळपास 5 महिन्यांनंतर खोऱ्यातील काही भागांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा आणि आवश्‍यक असलेल्या आस्थापनांमध्ये ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा सुरू केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही सेवा 15 जानेवारीपासून लागू झाली असून, फक्त सात दिवसांपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्थानीक प्रशासनाने इंटरनेट सर्व्हिस प्रदात्यांना दिलेल्या तीन पाणी आदेशामध्ये रुग्णालये, बॅंका आणि सरकारी कार्यालयांसारख्या अत्यावश्‍यक सेवांबरोबर पर्यटन सुलभ करण्यासाठी हॉटेल, टूर व ट्रॅव्हल आस्थापनांना ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा पुरवण्यास सांगितले. तथापी या भागांमध्ये सर्व सोशल मीडिया साईट्‌स बंद असणार आहेत.

एक नंबर! काळ्या साडीत खुललंय या तारकांचं सौंदर्य!!

तसेच या आदेशानुसार जम्मूमधील सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये इ-बॅंकिंगसह इतर महत्वपूर्ण वेबसाइट्‌स पाहण्यास पोस्ट पेड मोबाईलवर टू-जी मोबाइल सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, या जिल्ह्यांव्यतिरीक्त इतर जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी असणार आहे.

'निर्भया' बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा...

काश्‍मीर खोऱ्यातील परिस्थिती सामान्य : मुर्म
जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती सामान्य आहे आणि लोक विकास प्रक्रियेत सहभागी होत आहेत, अशी माहिती राज्यपाल जी. सी. मुर्मू यांनी बुधवारी दिली. तसेच येथील विकासामध्ये कोणतीही कसर सोडली जाणार नाही याची ग्वाही दिली. तसेच, प्रशासन जम्मू आणि काश्‍मीरमधील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत असून येत्या काही दिवसांमध्ये सर्व औपचारिक दळणवळण वाहिन्या पूर्ववत केल्या जातील असेही ते यावेळी म्हणाले.

सलग तिसऱ्या दिवशी बर्फवृष्टी
जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यात सलग तीन दिवसांपासून बर्फवृष्ती सुरू असून त्यामुळे येथील जनजिवन विस्कळीत झाले आहे. त्यातच या बर्फवृष्टीमुळे 40 ते 50 घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर काश्‍मीरमधील गांदरबल आणि कुपवाडा येथे सर्वात जास्त बर्फवृष्टी झाली असून त्यामुळे वीज आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत असल्याचे समोर आले आहे.

आता 'या' फोटोने लावले नेटिझन्सना वेड...

जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद
गेल्या तीन दिवसांपासून खोऱ्यात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग सलग तिसऱ्या दिवशीही बंद राहिला. तसेच या महामार्गावर पाच हजारांपेक्षा अधिक वाहने अडकून पडली आहेत. बर्फवृष्टीमुळे या माहामार्गावर वाहतूक बंद केली असून रामबन जिल्ह्यातील लखनपूर ते बनिहालकडे दरम्यान ही वाहने फसली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jammu kashmir internet links partially restored