पाकिस्तानी खासदाराचं रवीनाला चँलेज, दाखव माझ्यासारखं नाचून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raveena tondon
पाकिस्तानी खासदाराचं रवीनाला चँलेज, दाखव माझ्यासारखं नाचून

पाकिस्तानी खासदाराचं रवीनाला चँलेज, दाखव माझ्यासारखं नाचून...

बॉलीवूडमध्ये (Bollywood) आपल्या वेगळ्या शैलीतल्या अभिनयानं आणि डान्सनं अभिनेत्री रवीनानं (Raveena Tondon) चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. मोहरामध्ये तिनं अक्षय़सोबत केलेल्या टिप टिप बरसा पानी गाण्यावर केलेल्या डान्सची चर्चा झाली. रविना तेव्हापासून हिट झाली. अजूनही त्या गाण्याची जोरदार चर्चा होत असते. पार्टीमध्ये ते गाणं वाजतचं. केवळ भारतामध्ये नाही तर आपल्या शेजारील राष्ट्रामध्ये पाकिस्तानमध्ये देखील या गाण्याची मोठी क्रेझ आहे. सध्या सोशल मीडियावर एक गाणं व्हायरल झालं ते गाणं रवीनाचं आहे. त्या गाण्यावर चक्क पाकिस्तानी खासदारानं डान्स केला आहे. डांस (Pakistani Mp Aamir liaquat dance video)

पाकिस्तानी खासदारानं डान्स नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका समारंभामध्ये त्या खासदारानं केलेल्या डान्सनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडलं आहे. रविनानं मोहरा चित्रपटाममध्ये टिप टिप बरसा पानी गाण्यावर अफलातून डान्स केला होता. इतक्या वर्षानंतर देखील रविनानं अनेक रियॅलिटी शो मधून या गाण्यावर डान्स केला आहे.

हेही वाचा: Pakistan : 'पाकिस्तानचे निघाले दिवाळे, सरकार खोटं बोलतयं'

पाकिस्तानी खासदार आमिर लियाकत हुसैन (Aamir liaquat Hussain) यांनी केलेल्या डान्सची चर्चा झाली आहे. त्यांनी रवीनाच्या त्या गाण्यावर डान्स करताना एकप्रकारे रवीना आणि कतरिनाला चँलेज केलं आहे. तैमुर जमन नावाच्या एकानं सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये आमिरनं व्हाईट रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. त्यामध्ये त्यानं केलेल्या डान्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुसरीकडे इतर काही पाकिस्तानी खासदारांना मात्र आमीरचा असा अंदाज अजिबात आवडलेला नाही. त्यांनी त्याला ट्रोलही केलं आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीकाही केली आहे.

हेही वाचा: PM Modi Security Breach: जे झालं ते अतिशय लाजीरवाणं! कंगना बोललीच

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top