काश्मीर: दहशतवाद्यांच्या गोळीबारात मेजरसह जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

आज सकाळी शोपियाँ आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली. शोपियाँत लष्कराच्या ताफ्यावर हल्ल्या करून दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. या गोळीबारात मेजर कमलेश पांडे यांच्यासह एक जवान हुतात्मा झाला आहे.

जम्मू- जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मेजरसह एक जवान हुतात्मा झाला आहे. तर कुलगाम येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आले.

आज सकाळी शोपियाँ आणि कुलगाममध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली. शोपियाँत लष्कराच्या ताफ्यावर हल्ल्या करून दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. या गोळीबारात मेजर कमलेश पांडे यांच्यासह एक जवान हुतात्मा झाला आहे. गोळीबारानंतर पळून गेलेल्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी शोधमोहिम परिसरात मोहिम राबविण्यात येत आहे.

दुसरीकडे कुलगाममधील गोपालपुरा गावात सुरक्षा रक्षक आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांत चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांवरील रायफल्स आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यातील एक दहशतवादी पोलिसांच्या हत्येतील आरोपी होता. त्याने कुलगाम जिल्ह्यातील पोंबाई गावात पाच पोलिस कर्मचारी आणि दोन बँक कर्मचाऱ्यांची हत्या केली होती.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: J&K: Major Kamlesh Pandey, 2 jawans martyred in terrorist attack in Shopian