जेआरडी टाटांना काँग्रेसमध्ये जायचं होतं पण…

JRD Tata यांचे गांधी-नेहरु घराण्याशी कसे संबंध होते?
 जेआरडी टाटा
जेआरडी टाटाsakal

जे आरडी टाटा एकेकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार होते, असं सांगितलं तर नवल वाटेल ना.. पण मंडळी खरंच जेआरडी टाटा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते पण पुढे काय आडकाठी आली आणि त्यांनी आपला निर्णय बदलला. हो हे खरंय.

जहाँगीर रतनजी दादाभाई टाटा हे जेआरडी टाटांचं पूर्ण नाव. २८ जुलैला त्यांचा वाढदिवस असतो. याच जेआरडी टाटांमुळे आज एअर इंडिया उभी आहे. टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीची स्थापनाही जेआरडी टाटांनीच केली. त्यानंतर आपली सारी संपत्ती त्यांनी टाटा सन्सच्या नावे केली. टाटा देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजकांपैकी एक होते. देशाच्या सत्ताधाऱ्यांसोबत, पंतप्रधानांसोबत जेआरडी टाटांचे कायमच सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत. तरुणपणी टाटांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार आला होता पण त्यांनी नंतर तो विचार सोडून दिला. (JRD Tata Latest Update)

 जेआरडी टाटा
TATA Shares : टाटा ग्रुपच्या 'या' 2 स्‍टॉक्‍समध्ये मिळेल 68% रिटर्न...

एस ए सबावाला आणि रुसी एम लाला लिखित 'जेआरडी टाटा कीनोट' या पुस्तकात जेआरडी टाटांच्यावतीनं लिहिण्यात आलंय, "जेव्हा मी तरुण होतो, तेव्हा मला काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा विचार आला होता. पण जेव्हा मला कळालं की नेता बनल्यानंतर तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर मी विचार केला की तुरुंगात राहून मी काहीच विशेष करु शकणार नाही आणि तुरुंगातील जीवन जगून मी आयुष्यातही काही घडवू शकणार नाही. म्हणून मी उद्योग विश्वात जाऊन देशसेवा करेन असा निश्चय केला."

असं कीनोट या पुस्तकात नमूद करण्यात आलंय.

 जेआरडी टाटा
Tata Nexon ही पेटली! स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक कारही धोकादायक?

आता टाटांच्या डोक्यात तुरुंगात जायचा विचार कसा आला? तर देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं. यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या समाजवादाशी जेआरडी प्रभावित नव्हते. तर ते त्यांचे प्रशंसक आणि मित्र होते. एका मुलाखतीत नेहरुंसोबतच्या नात्याविषयी विचारलं असता ते म्हणाले होते की, जेव्हाही आर्थिक विषयांवर गप्पा मारायचो तेव्हा नेहरु त्यावर लक्ष द्यायचे नाहीत.

एअर इंडियाचं राष्ट्रीयीकरण करण्यावरुनही दोघांमध्ये मतभेद होते. एअर इंडिया सरकारनं चालवावं, असं जेआरडींना अजिबात वाटत नव्हतं पण अखेर नेहरुंच्या बाजूनं ठरलं आणि एअर इंडिया केंद्र सरकारच्या हाती गेली.

 जेआरडी टाटा
महिंद्रा 'या' दिवशी लाँच करणार इलेक्ट्रिक XUV300; Tata Nexon EV ला देणार तगडी टक्कर

विशेष म्हणजे टाटा समूह काँग्रेस पक्षाला निधी पुरवायचा. १९६१ साली राजा गोपालाचारी यांनी जेआरडी टाटांना पत्र लिहून स्वतंत्र पार्टीसाठी निधी मागितला होता. तेव्हा जेआरडींनी नेहरुंना पत्र लिहिलं. जेआरडी यांनी त्या पत्रात म्हटलं होतं, की कम्युनिस्ट पक्षानं कायम दुसऱ्या स्थानी असावं असं आपल्याला अजिबात वाटत नाही. कारण त्यांच्या आत्म्यात लोकशाही नाही.

नेहरुंनी त्यासाठी आपण दुसऱ्या एका पक्षाला निधी द्यायचा विचार केला असल्याचंही नेहरुंना कळवलं. त्याला नेहरुंनी मंजुरी तर दिली पण देशात तो पक्ष कधीच मजबूत स्थितीत नसेन असंही आवर्जून नमूद केलं.

 जेआरडी टाटा
TATA या दिवशी लाँच करणार नवीन कार; जाणून घ्या डिटेल्स

एकीकडे नेहरुंनी जरी टाटांकडून एअर इंडिया सरकारकडे घेतली असली तरी जेआरडींचं त्यांच्याशी वैर कधीच आलं नाही. पण पुढे याच जेआरडींनी मोरारजी देसाईंना कधीच माफ केलं नाही. कारण एका वेळचा मित्र आणि तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनीच जेआरडींना एअर इंडियातून बाहेर केलं. त्यामुळे तो क्षण जीवनातील सर्वात वाईट क्षण होता आणि त्याबाबत आपण देसाईंना कधीच माफ करु शकत नाही, असंही जेआरडींनी म्हटलं होतं.

दुसरीकडे १९७५ साली राष्ट्रीय आणीबाणी घोषित करणाऱ्या इंदिरा गांधींच्या त्या निर्णयाला जेआरडी टाटांचं समर्थन होतं. कारण त्याकाळात संप, निदर्शनं थांबवण्यात आली होती, ज्याचा फायदा उद्योग विश्वाला झाला. त्यानंतरही इंदिराजींनी जेआरडींना एका पत्रातून आपलं मत, प्रतिक्रिया व्यक्त करण्याचंही निवेदन केलं होतं. पण तरी, राष्ट्रीयीकरणावरुन इंदिरा गांधी आणि त्यांच्यातही मतभेद होते.

 जेआरडी टाटा
Tata Neu Super App : तिकीट बुकिंगपासून जेवण मागवण्यापर्यंत, होतील सगळी काम

नेहरुंच्या अनेक धोरणांशी ते सहमतही नव्हते. तर तिकडे राजीव गांधींनी जेव्हा १९९१ साली जागतिक अर्थव्यवस्थेची दारं खुली केली तेव्हा आर्थिक विषयांवर उद्योगपतींशीही त्यांनी संवाद साधला. त्यावेळीही जेआरडींनी म्हटलं होतं की यामुळे आनंद आहे आणि थोडंस वाईटही वाटतंय. देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत उतरु शकतो याचा आनंद झाला तर वयाच्या या टप्प्यावर आता त्यात सहभागी होता येणार नसल्यानं आपल्याला वाईट वाटत असल्याचं जेआरडींचं मत होतं.

याच जेआरडी टाटांना १९९२ साली केंद्र सरकारनं देशाच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यामुळे जेआरडी टाटांचा हा नेहरु घराण्यासोबत आणि देशाच्या माजी पंतप्रधानांसोबत आणि मुख्यत्वे काँग्रेस प्रवेशासंबंधीचा किस्सा आपल्याला कसा वाटला? हे आम्हांला कमेंट करुन नक्की सांगा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com