Gruhalakshmi Scheme : कुटुंबातील महिला प्रमुखाला मिळणार दरमहा दोन हजार रुपये; 'गृहलक्ष्मी' योजना 13 हजार ठिकाणी होणार सुरू

काँग्रेस आघाडी सरकारची ही चौथी हमी योजना आहे.
Karnataka Government Gruhalakshmi Scheme
Karnataka Government Gruhalakshmi Schemeesakal
Summary

या योजनेंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये मिळणार आहेत.

बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारची (Karnataka Government) महत्त्वाकांक्षी ‘गृहलक्ष्मी’ योजना (Gruhalakshmi Scheme) बुधवारी १३ हजार ठिकाणी एकाच वेळी सुरू होणार आहे. म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात दक्षिण कर्नाटकातील पाच जिल्ह्यांतील १.१ लाखांहून अधिक महिला लाभार्थी सहभागी होतील.

म्हैसूर येथील मुख्य कार्यक्रमात अखिल भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह अनेक मंत्री व आमदार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे राज्यभर थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

Karnataka Government Gruhalakshmi Scheme
Gokul Dudh Sangh : उच्च न्यायालयाच्या 'या' निकालानंतर शौमिका महाडिक आक्रमक; गावोगावी जाऊन सांगणार 'ही' माहिती

म्हैसूर येथील महाराजा कॉलेज ग्राऊंडवर कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना आणण्यासाठी केएसआरटीसी एक हजार ८०० बसेस उपलब्ध करून देत आहे. हेब्बाळकर म्हणाल्या की, म्हैसूर, हासन, चामराजनगर, कोडगू आणि मंड्या जिल्ह्यातील लाभार्थी म्हैसूरमधील उद्‍घाटन कार्यक्रमात सामील होतील.

Karnataka Government Gruhalakshmi Scheme
Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

या योजनेंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये मिळणार आहेत. काँग्रेस आघाडी सरकारची ही चौथी हमी योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशा आणि अंगणवाडी सेविकांना पाच जिल्ह्यांतील महिला लाभार्थ्यांना म्हैसूरमध्ये आणण्याची जबाबदारी दिली आहे.

Karnataka Government Gruhalakshmi Scheme
Wedding Ceremony : लग्नातलं जेवण पडलं महागात; तब्बल 200 हून अधिक जणांना विषबाधा; मिरजेतील पाहुण्यांचाही समावेश

सर्व ग्रामपंचायती आणि शहर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लाभार्थ्यांच्या उपस्थितीत ही योजना सुरू केली जाईल, जेणेकरून ते काँग्रेस सरकारच्या योजनांचा लाभ घेतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com