Kashi Vishwanath Temple: श्रावणात घरबसल्या काशी विश्वनाथ मंदिरात करू शकता रुद्राभिषेक; कसं करता येईल बुकिंग, जाणून घ्या...

श्रावणातल्या सोमवारी या उपक्रमांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळणार असल्याची प्रशासनाची अपेक्षा आहे.
kashi vishwanath temple
kashi vishwanath templesakal

भगवान बाबा विश्वनाथ यांचा रुद्राभिषेक तुम्ही आता घरबसल्याही करू शकता. श्री काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने यासाठी नवीन सेवा सुरू केली आहे. श्रावण महिन्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने ऑनलाइन रुद्राभिषेकाची व्यवस्था केली आहे.

सोमवारी त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर आता या मंदिरात श्रावणाच्या सोमवारी भक्तांना भगवान भोलेनाथांचा रुद्राभिषेक करता येणार आहे.

kashi vishwanath temple
Jyotiba Temple : जोतिबा डोंगराला जाताय? मग, ही बातमी आधी वाचा; 'हा' मुख्य मार्ग बनलाय धोकादायक!

काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार वर्मा यांनी सांगितलं की, या व्यवस्थेअंतर्गत भक्तांना श्रावण महिन्याच्या सोमवारी घरी बसून बाबांचे रुद्राभिषेक, दर्शन आणि शिखर दर्शन घेता येणार आहे. यासाठी ७०० रुपये तिकीट निश्चित करण्यात आलं आहे. ही पद्धत पूर्वी मंदिरातही लागू होती जी नंतर बंद करण्यात आली, मात्र आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

भाविकांना मंदिराची अधिकृत वेबसाइट www.shrikashivishwanath.org वर जाऊन ऑनलाइन रुद्राभिषेकसाठी तिकीट बुक करावं लागेल. त्यानंतर मंदिराने नियुक्त केलेले अर्चक मंदिरात ऑनलाइन माध्यमातून भाविकांशी संपर्क साधून रुद्राभिषेक करून भाविकांना बाबांचे दर्शन देतील.

kashi vishwanath temple
Trending News: कोट्यधीशाची बायको असूनही करतेय नोकरी; महिलेचे खुलासे ऐकून हैराण व्हाल!

श्रावण महिन्यात आतापर्यंत ९० लाख भाविकांनी बाबा विश्वनाथांच्या दरबारी पूजा केली आहे. श्रावणातल्या पाचव्या सोमवारी ६ लाखांहून अधिक भाविकांनी बाबांच्या दरबारात पोहोचून त्यांचं दर्शन, पूजा आणि अभिषेक केला. बाबांच्या नव्या आणि भव्य धामच्या निर्मितीनंतर सुमारे १० कोटी लोक इथं आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com