

Investors Eye Kenya as Strategic Gateway to African Economic Expansion
sakal
‘इंडिया-आफ्रिका फोरम समिट’च्या पार्श्वभूमीवर भारत आणि केनिया यांच्यातील संबंधांचा आढावा घेणे आवश्यक आहे. पूर्व आफ्रिकेतील सर्वांत महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेला केनिया हा आफ्रिकेच्या व्यापार, वाहतूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील केंद्र मानला जातो. हिंदी महासागर किनाऱ्यावरील सामरिक स्थान, विकसित बंदर व्यवस्था आणि वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था यामुळे भारतासाठी केनिया महत्त्वाचा भागीदार ठरत आहे. भारतीय वंशीय समुदायाची उपस्थिती आणि क्रिकेट-बॉलिवूडमुळे दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक जवळीकही निर्माण झाली आहे. आता कृषी, औषधनिर्मिती, हरित ऊर्जा, आयटी आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात आहे.