'नेझल व्हॅक्सीन'चं काय आहे वेगळेपण? किती आहे प्रभावी; जाणून घ्या सर्वकाही

'नेझल व्हॅक्सीन'चं काय आहे वेगळेपण? किती आहे प्रभावी; जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट सध्या थैमान माजवत आहे. या संकटावर मात करण्यासाठी कोरोना लसीचं उत्पादन आणि लसीकरणाच्या मोहिमेला गती दिली जात आहे. देशात सध्या दोन कोरोना लसी उपलब्ध आहेत. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींसह सध्या देशातील कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. कोरोना लसीसंदर्भात आणखी काही प्रयोग सध्या सुरु आहेत. इंजेक्शनद्वारे देण्यात येणाऱ्या लसीव्यतिरिक्त नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीची निर्मिती करण्याचं काम देखील गतीने सुरु आहे. काल सोमवारी पंतप्रधान मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना याच नाकावाटे देण्यात येणाऱ्या नेझल व्हॅक्सिनचा उल्लेख केला होता. त्यामुळे काय आहे ही नेझल व्हॅक्सीन? इतर लसींमध्ये आणि या लसीमध्ये नेमका काय फरक आहे? याविषयीच आपण सविस्तरपणे माहिती घेऊयात... (Know all about Nasal Vaccine How Does It Work And How Is It Different From Existing Corona Vaccines)

'नेझल व्हॅक्सीन'चं काय आहे वेगळेपण? किती आहे प्रभावी; जाणून घ्या सर्वकाही
नाकातून देण्यात येणाऱ्या लसीवरही संशोधन सुरु - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सोमवारी देशाला संबोधित करताना म्हटलंय की, कोरोना लसीसंदर्भात अनेक प्रकारचे प्रयोग सध्या केले जात आहेत. नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीवर देखील संशोधन सुरु आहे. ही लस इंजेक्शनद्वारे न देता नाकामध्ये स्प्रे केली जाईल. जर या लसीच्या चाचणीमध्ये यश आलं तर देशातील लसीकरणाच्या मोहिमेला निश्चितच गती येईल, असंही पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितलं आहे.

'नेझल व्हॅक्सीन'चं काय आहे वेगळेपण? किती आहे प्रभावी; जाणून घ्या सर्वकाही
LGBTIQ कम्युनिटीने नाही, तर समाजाने दृष्टीकोन बदलावा- हायकोर्ट

कशी काम करते ही नेझल व्हॅक्सीन?

नेझल व्हॅक्सीन ही इंजेक्शनद्वारे देण्याऐवजी नाकावाटे दिली जाते. ही नाकाच्या आतील भागांमध्ये प्रतिकारशक्ती तयार करते. या लसीला प्रभावी मानलं जातं कारण कोरोनासहित हवेतून पसरणारे अधिकतर आजार हे नाकावाटेच संक्रमित होतात. त्यामुळे नाकाच्या आतील भागांमध्ये प्रतिकारशक्ती तयार होण्याने या प्रकारच्या आजारांना रोखण्यात पुरेसं यश मिळू शकतं.

'नेझल व्हॅक्सीन'चं काय आहे वेगळेपण? किती आहे प्रभावी; जाणून घ्या सर्वकाही
'या' कारणास्तव आणखी वेळ हवाय; IT नियमांबाबत ट्विटरची सरकारकडे मागणी

नेझल व्हॅक्सिनचे 'हे' आहेत फायदे


1. इंजेक्शनची भीती असणाऱ्यांना दिलासा
2. नाकाच्या आतील भागामध्ये प्रतिकार यंत्रणा तयार झाल्याने श्वासावाटे होणारे संक्रमणाचा धोका कमी
3. इंजेक्शनपासून सुटका झाल्याने हेल्थ वर्कर्सना ट्रेनिंग देण्याची गरज नाही
4. लहान मुलांचं लसीकरण आणखी सोपं होणार
5. उत्पादन सोपं झाल्याने जगभरात मागणीनुसार उत्पादन आणि पुरवठा शक्य

भारत बायोटेककडून नेझल व्हॅक्सीनचं परिक्षण


हैद्राबादमधील भारत बायोटेक कंपनी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी करणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या विशेषज्ज्ञांच्या समितीने त्यास मंजूरी दिली आहे. सध्या पहिल्या टप्प्याअंतर्गत याची चाचणी होईल. या चाचणीचे निष्कर्ष मिळाल्यानंतरच पुढील चाचणीसाठी अनुमती दिली जाईल. कंपनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील चार राज्यांमध्ये या लसीची चाचणी केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाड, बिहार आणि तेलंगना ही राज्ये सामील आहेत.

बाजारात अशा नेझल व्हॅक्सीन उपलब्ध आहेत का?

इन्फ्लूएन्झा आणि नेझल फ्लूची नेझल व्हॅक्सीन अमेरिकेसारख्या देशात उपलब्ध आहे. याच प्रकारे जनावरांमधील केनेल कफसाठी कुत्र्यांना वगैरे नाकावाटेच लस दिली जाते. 2004 मध्ये एंथ्रॅक्स आजारावेळी अफ्रिकेत प्रयोगासाठी नाकावाटेच माकडाला अशी नेझल व्हॅक्सीन देण्यात आली होती. 2020 मध्ये कोरोनाचं संकट उद्भवल्यानंतर उंदीर आणि माकडांवर केलेल्या प्रयोगांमधून असं आढळलंय की, नाकावाटे लस देऊन विषाणूचं संक्रमण रोखता येऊ शकतं. याचा परिणाम म्हणून नाकाच्या आतील खालील आमि वरच्या भागामध्ये व्हायरल क्लिअरन्स म्हणजेच प्रोटेक्शन तयार होत असल्याचं आढळलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com