Weekend Holiday : मोफत बसप्रवासामुळं विकेंडला धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी; महिला प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ

बेळगावसह राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर विकेंडला गर्दी वाढत आहे.
Murudeshwar Temple Karnataka
Murudeshwar Temple Karnatakaesakal
Summary

राज्यात ११ जूनपासून मोफत बससेवा सुरु करण्यात आली आहे.

बेळगाव : बेळगावसह राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर विकेंडला गर्दी वाढत आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस भाविकांनी गर्दी केली होती. राज्य शासनाकडून अलीकडे मोफत बससेवेची (Free Bus Services) घोषित केल्यामुळे महिला भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

Murudeshwar Temple Karnataka
Monsoon Update : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! परशुराम घाटातून प्रवास करताय? मग, ही बातमी आधी वाचा..

बेळगाव जिल्ह्यातील श्री यल्लम्मा देवस्थान, चिंचली मायाक्का मंदिरसह राज्यातील शिर्शी, गोकर्ण, मुरडेश्‍वर, कुडलसंगम आदी महत्त्‍वाच्या धार्मिकस्थळी भाविकांची गर्दी कमालीची वाढली आहे. काँग्रेस सरकारच्या पाच महत्त्‍वकांक्षी गॅरंटी योजनांपैकी महिलांसाठी मोफत बसप्रवास ही एक आहे.

Murudeshwar Temple Karnataka
Anil Deshmukh : ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा भाजपनं उचलला विडा; माजी गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

त्याला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. रिक्षा व खासगी प्रवासी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिलांकडून आता बसप्रवासाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे बसमध्ये नेहमीपेक्षा अधिक गर्दी वाढली आहे. शिवाय धार्मिक स्थळांवरही गर्दीत वाढ झाल्याचे आढळून येत आहे.

दरम्यान, राज्यात ११ जूनपासून मोफत बससेवा सुरु करण्यात आली आहे. २५ जूनपर्यंत ७ कोटी ६४ लाख ४० हजार ५२६ महिलांनी प्रवास केला असून, त्यांच्या तिकिटाची रक्कम १७९,२८,०८,४१० रुपये आहे. त्यापैकी कर्नाटक वायव्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास केलेल्या महिला प्रवाशांची संख्या २ कोटी ३३ लाख ७७ हजार १५१ आहे.

Murudeshwar Temple Karnataka
KS Eshwarappa : '..म्हणून कर्नाटकात ऑपरेशन लोटस् अपयशी ठरलं, त्या बेशिस्त आमदारांची शेपूट छाटणार'

त्यांच्या तिकिटाची रक्कम ६७ कोटी १६ लाख ३१ लाख ९१५ रुपये आहे. मात्र, हा प्रवास महिलांनी मोफत केला आहे. यापैकी बहुतेक महिला या नोकरी, कामानिमित्त परगावी जाणाऱ्या आहेत. मात्र, शनिवारी आणि रविवारी प्रवास केलेल्या महिलांपैकी बहुतेक महिला या पर्यटनस्थळ, धार्मिकस्थळी भेट देणाऱ्या आहेत, अशी माहिती परिवहन मंडळ अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com