Latest Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर उद्या बुधवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे.
Marathi News LIVE Updates
Marathi News LIVE UpdateseSakal

MNS: महेश जाधव यांनी फेसबुक पोस्ट केली डिलिट

मनसेचे नेते महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करणारा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. तो त्यांनी आता डिलिट केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक; दोन्ही उपमुख्यमंत्री अन् रश्मी शुक्ला राहणार उपस्थित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्री अन् पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहेत.

Ghaziabad: यूपीतील गाझीयाबाद जिल्ह्याचे नाव बदलणार?

उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती गाझीयाबादच्या महापौरांनी दिली आहे.

Sanjay Raut: महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा- संजय राऊत

आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

ED Attack: ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी केंद्राची पश्चिम बंगाल सरकारला रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना

पश्चिम बंगालमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी केंद्राने पश्चिम बंगाल सरकारकडे रिपोर्ट सादर करण्याची मागणी केली आहे.

Rajnath Singh : राजनाथ सिंहांचा ब्रिटन दौरा; द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लंडनमध्ये असून त्यांनी ब्रिटनच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशात कॅडर एक्सचेंज करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

मालदीवसाठी पुन्हा फ्लाईट बुकिंग सुरु होणार? 

रश्मी शुक्लांनी स्विकारला पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार आज स्विकारला. राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाहयान गुजरातमध्ये दाखल

व्हायब्रंट गुजरात समिटसाठी युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे अहमदाबादमध्ये दाखल झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी आणि युएईचे अध्यक्ष अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहे.

कोस्ट गार्ड आणि स्टील अथोरिटी ऑफ इंडियाचा सामंजस्य करार

इंडिया कोस्ट गार्ड आणि स्टील अथोरिटी ऑफ इंडियाने भारतीय बनावटीच्या शिप तयार करण्यासाठी एक ठोस पाऊल टाकलं आहे.मरीन ग्रेड स्टीलचा पुरवठा करण्यासाठी या दोघांमध्ये सामंजस्य करार झाला आहे.

फ्रान्सचे 34 वर्षाचे शिक्षण मंत्री गॅब्रिएल अॅटल नवे पंतप्रधान 

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी 34 वर्षाचे शिक्षणमंत्री गॅब्रिएल अॅट्टल यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. ते फ्रान्सचे सर्वात तरूण आणि ओपनली गे पंतप्रधान झाले आहेत.

नवी मुंबईत मनसेचे दोन गट आमने सामने 

नवी मुंबईत मनसेचे दोन गट आमने सामने आले. कामगार सेनेचे पदाधिकारी महेश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला. आपण कामगारांची बाजू लावू धरल्याने ही मारहाण झाल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

यानंतर मराठी कामगार सेनेची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर दोन गट आमने सामने आले.

व्हायब्रंट गुजरातमध्ये जपानच्या 70 पेक्षा जास्त कंपन्यांचा समावेश

अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेडला जपानचे राजदूत हिरोशी सुझूकी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जपानच्या 70 कंपन्यांनी यामध्ये भाग घेतल्याचं सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हायब्रंट गुजरात ग्लोबल ट्रेड शोला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हायब्रंड गुजरात ग्लोबल ट्रेड शोला भेट देऊन पाहणी केली.

जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचे धाडसत्र 

रविंद्र वायकर यांच्याशी संबंधित असलेल्या 7 ठिकाणी ईडीने धाड टाकली असून सकाळी 8 वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे.

एनडीएमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कोणतीही अडचण नाही - नितेश राणे

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर भाजप आमदार नितेश नारायण राणे म्हणाले, "एनडीएमध्ये (जागा वाटपाच्या संदर्भात) कोणतीही अडचण नाही. आम्ही एकत्र आहोत, आमचे नेते संवाद साधत आहेत आणि चांगले संबंध आहेत... एमव्हीए नेते तसे करत नाहीत. एकमेकांवर विश्वास ठेवा..."

कदाचीत हे सरकार टिकलं तर मंत्रालय सूरतला नेतील- आदित्य ठाकरे

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट चुकीची आहे. आमची सत्याची बाजू आहे. कदाचीत हे सरकार टिकलं तर मंत्रालय सूरतला नेतील. देशात लोकशाही टिकणार की नाही?, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

तमाम तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहे अन् उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहेत - जयंत पाटील

तलाठी भरती घोटाळ्याबाबत सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. स्पर्धा परीक्षेदरम्यान सातत्याने होत असलेली पेपर फुटी, भ्रष्टाचार यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या तमाम तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

चौकशी म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही - सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी वनमंत्री म्हणून काम केल. आमच्यावर चौकशी लागली पण आम्हाला कधी रडायची गरज नाही पडली. अमित शाह यांना जेलमध्ये टाकलं , मोदीजींची ९ तास चौकशी झाली. अनेक चौकश्या झाल्या सर्व चौकश्या काँग्रेसच्या काळात झाल्या. आता भावना गवळीवर पण चौकशी होत आहे. त्यांचा तर आम्हाला पाठिंबा आहे. चौकशी म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही. राजकारणात आहे म्हणून सुट द्यायची का? कोणताही नेता असेल चौकशीस पात्र आहे. 

पंतप्रधान पदाचा मान राखायला हवा; मालदीव प्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया

भारत-मालदीव वादात शरद पवारांनीही आपलं मत मांडलं आहे. "नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. दुसऱ्या देशातील एखादी पदाधिकारी व्यक्ती जर त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल, तर त्याला नक्कीच विरोध असेल. आपण पंतप्रधान पदाचा मान राखायला हवा. देशाच्या बाहेरील व्यक्ती जर पंतप्रधानांच्या विरोधात काही बोलत असेल तर आम्ही ते स्वीकारणार नाही" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिली आहे.

स्पीकरवर संशय येणे हे दुर्दैवी - नाना पटोले

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी लोकसभा अध्यक्षांवरच संशय येणे हे राज्यासाठी भूषावह नाही असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न, हेल्दी चर्चा होईल - नाना पटोले

जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की आज हेल्दी चर्चा होईल. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आमचं लक्ष्य आहे. वंचितबाबत देखील आमची सकारात्मक भूमिका आहे. आज चर्चेत प्रस्ताव येईल तेव्हा यावर अधिक बोलणी होईल.

शिवसेनेबाबत उद्या तर राष्ट्रवादीबाबत जानेवारी अखेर निर्णय

शिवसेनेबाबत उद्याच निकाल देण्याचा प्रयत्न आपण करणार असून, राष्ट्रवादीबाबत देखील 30 जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचा प्रयत्न आहे; असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

BJP: चंद्रशेखर बावनकुळे  यांनी केली नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती

शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 22 जानेवारी रोजी नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात आरती करणार आहेत. मात्र त्या आधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज काळाराम मंदिरात आरती केली.

बाणेर बालेवाडी परिसरात पाऊस

बाणेर बालेवाडी परिसरात सकाळपासून पाऊस सुरु आहे. कमी प्रमाणात अधून मधून रिमझिम होत आहे.

Rajan Vichare: राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. हा उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का म्हटला जात आहे.

 Anil Parab: अध्यक्ष कधीही मुख्यमंत्र्यांना भेटायला जात नाहीत  

विधानसभा अध्यक्ष कधीच मुख्यमंत्र्यांना भेटायला जात नाहीत तर ते स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटायला बोलावतात असे आमदार अनिल परब म्हणाले.

Uddhav Thackeray: आजारी नार्वेकर २ वेळा आरोपींना भेटले ; उद्धव ठाकरेंचा टोला

विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर आजारी असताना २ वेळा आमच्यासाठी आरोपी असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत.यामुळे उद्याचा निकाल वेडा वाकडा लागला तर काय? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला

Rain Update:  हडपसर, मांजरी परिसरात दोन तासांपासून रिमझिम पाऊस

 हडपसर, मांजरी परिसरात दोन तासांपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. आज राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळ पासुन पुणे शहर परिसरात पावसाने हजेरी लावली आहे

 Sharad Pawar: प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्याची भूमिका मांडू

आज दिल्लीत महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक होत आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ही संयुक्तीक बैठक असणार आहे. यावेळी आम्ही प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्याची भूमिका या बैठकीत मांडू असे शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

Sharad Pawar: बिल्किस बानो प्रकरणाच्या निकालाने सर्वसामान्य नागरिकांना आधार मिळाला 

बिल्किस बानो प्रकरणाच्या निकालाने सर्वसामान्य नागरिकांना सन्मान आधार मिळाला अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आदित्य ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. पक्ष विस्तारासाठी ते आले कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. याठिकाणी ते ३ सभा घेणार आहेत.

Rain Update: पुणे परिसरातील वडगाव धायरी नऱ्हे परिसरात रिमझिम सुरू

पुणे परिसरातील वडगाव धायरी नऱ्हे परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.आज राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी साताऱ्यासह, पुणे शहर परिसरात पावसाने हजेरी लावली.

साताऱ्याची अदिती, नागपूरच्या ओजसला अर्जुन पुरस्कार

साताऱ्याची अदितीला आणि नागपूरच्या ओजसला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवन येथे या पुरस्काराचे वितरण होत आहे.

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. सकाळी ८.३० वाजल्यापासून ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले.

Maratha reservation | मागासवर्ग आयोगाची दहा तारखेला मुंबईत बैठक

मागासवर्ग आयोगाची दहा तारखेला मुंबईत बैठक पार पडणार आहे. आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

Pune Rain : पुण्यात वाघोली परिसरात अवकाळी पाऊस

पहाटेपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं उकाडाही जाणवत होता. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळं सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची त्रेधातिरपट उडाली.

Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आज दिल्लीत बैठक

महाराष्ट्रातल्या जागा वाटप संदर्भात आज नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे. संध्याकाळी चार वाजता ही बैठक होणार असून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह नाना पटोले, जितेंद्र आव्हाड बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत ही बैठक होणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

बैठकीसाठी कोण उपस्थित असणार?

शिवसेना ठाकरे गट - संजय राऊत आणि विनायक राऊत

काँग्रेस - नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात

राष्ट्रवादी - जितेंद्र आव्हाड आणि आणखी एक नेते असतील ते नाव निश्चित नाही

बैठकीच ठिकाण - मुकुल वासनिक यांचं निवासस्थान

Weather Update : राज्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज

राज्यात आज बहुतेक ठिकाणी ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आले आहे. तर १२ जानेवारीपासून राज्यात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे.

Accident News : ट्रकवर कार आदळली! दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू

हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील कुंडली बॉर्डरजवळ काल रात्री साडेअकरा वाजता एका ट्रकवर कार आदळल्याने दोन दिल्ली पोलीस निरीक्षकांचा मृत्यू झाला .

leakage in the chlorine cylinder : डेहराडूनमध्ये क्लोरीन गॅल लीक; पोलीस, NDRF, SDRF आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

leakage in the chlorine cylinder : उत्तराखंडच्या डेहराडूनमधील प्रेम नगर पोलीस ठाण्याच्या झांजरा परिसरात रिकाम्या प्लॉटमध्ये ठेवलेल्या क्लोरीन सिलिंडरमधून गॅस लीक झाल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Sri Lanka : श्रीलंकेतून चेन्नईला परततले 13 भारतीय मच्छिमार

13 भारतीय मच्छिमारांना आज सकाळी श्रीलंकेतून चेन्नईला परत आणण्यात आले आहे. इंडिया इन श्रीलंकाच्या एक्स अकाउंटवरून फोटो पोस्ट करत याबद्दल माहिती दण्यात आली आहे

Israel Attack : इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा वरिष्ठ कमांडो ठार

लेबनॉनच्या हल्ल्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर देत कारवाई केली आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात हिजबुल्लाच्या स्पेशल कमांडो युनिट राडवान फोर्सचा एक वरिष्ठ कमांडर मारला गेला असल्याचं वृत्त आहे. 

Hit and Run Act : हीट अँड रन कायद्याचा पुनर्विचार करा - मनसे

कोल्हापूर : हिट अँड रन हा कायदा वाहनचालकांच्या विरोधात आहे. यातील शिक्षेच्या जाचक अटीमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या कायद्याबाबत पुनर्विचार करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Aditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आज (ता.९) पासून दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उपनेते संजय पवार यांच्यासह सर्वच नेते मंडळींनी संपर्कासह नियोजन बैठकांवर भर दिला आहे. महिला आघाडीच्या वतीनेही ठिकठिकाणी बैठका घेऊन दौरा यशस्वी करण्याचे नियोजन केले आहे. शहरात मिरजकर तिकटी येथे आज (ता. ९) सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार आहे.

Indonesia Earthquake : भूकंपामुळं इंडोनेशियाची जमीन हादरली

इंडोनेशिया : इंडोनेशियातील एका बेटावर मंगळवारी (9 जानेवारी) 6.7 तीव्रतेचा भूकंप जाणवला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या खाली 80 किमी खोलीवर होता. भारतीय वेळेनुसार रात्री 2.18 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

Marathi News LIVE Updates
Indonesia Earthquake: तीव्र भूकंपामुळे इंडोनेशिया हादरलं, रिश्टर स्केलवर 6.7 तीव्रता

'भारत UNESCO च्या जागतिक समितीचं अध्यक्षपद भूषवणार'

भारत 21 ते 31 जुलै 2024 या कालावधीत UNESCO च्या जागतिक वारसा समितीचं अध्यक्ष व यजमानपद भूषवणार असल्याची माहिती UNESCO मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही शर्मा यांनी दिली.

Pune Rain : पुण्यात सर्वत्र ढगाळ वातावरण, पहाटे ग्रामीण भागात बरसल्या पावसाच्या सरी

पुण्यात सकाळीपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच पुण्यातील ग्रामीण भागामध्ये म्हणजेच हडपसर, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, फुरसुंगी या भागात पहाटे रिमझिम पाऊस होता.

Weather Update : पुढील 24 तासात देशभरात जोरदार पावसाची शक्यता, अनेक राज्यांना अलर्ट जारी

पुढील 24 तासात तमिळनाडू किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलसह कर्नाटक, केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Marathi News LIVE Updates
Weather Update: पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अलर्ट जारी

Mayiladuthurai, Tamil Nadu : तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस, वैतीश्वरन मंदिराचा परिसर झाला जलमय

मायलादुथुराई (तामिळनाडू) : येथे सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे वैतीश्वरन मंदिराचा परिसर जलमय झाला आहे.

Pimpode Budruk : रणदुल्लाबादला महिलेचा शॉक लागून जागीच मृत्यू

पिंपोडे बुद्रुक : रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) येथे घरात पाणी भरताना विद्युत मोटारचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू झाला. रूपाली रवींद्र जगताप (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

ShivSena MLA Disqualification Case : शिवसेना कोणाची? उद्या 4 वाजता फैसला

Latest Marathi News Live Update : शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर उद्या बुधवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता ‘शिवसेना कोणाची’ आणि ‘ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी चार वाजल्यानंतर सुनावणार आहेत. तसेच देशभर गाजलेल्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबीयांच्या खूनप्रकरणातील अकरा दोषींची मुदतीपूर्वीच सुटका करण्याचे गुजरात सरकारचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज रद्दबातल ठरवितानाच त्यांना दोन आठवड्यांमध्ये तुरुंगात पाठवा, असे खडे बोल सुनावले. त्याचबरोबर अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा उद्‍घाटन सोहळा होणार आहे, याची जय्यत तयारी सुरु आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्याचबरोबर देशभरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नागरिकांत भीतीचं वातावरण आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com