esakal | गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा ते राहुल गांधींनी शब्द पाळला; ठळक बातम्या क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

breakfast news

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा ते राहुल गांधींनी शब्द पाळला; ठळक बातम्या क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका लहान मुलाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना ते कन्याकुमारीला गेले होते. यावेळी एका 12 वर्षाच्या मुलाला त्यांनी मदत करण्याचे वचन दिले होते. महाशिवरात्रीचे निमित्त साधून अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी ताजमहलमध्ये भगवान शंकराची पूजा केल्याचा प्रकार घडला आहे.  CISF ने तीन महासभेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या हवाले केले आहे. एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पडळकर आणि सहकाऱ्यांना रात्री अटक करून जामिनावर सोडून देण्यात आलं आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एटीएस आता तपास करत आहे. याच तपासाचा भाग म्हणून १० मार्च आणि ११ मार्चच्या रात्री ATS पथकाने मुंब्रा रेतीबंदर येथे 'क्राइम सीन'चे प्रात्याक्षिक करून पाहिले.

देश- खुशखबर! कोरोना लसीची किंमत घटली; प्रति डोस 200 रुपयांपेक्षाही कमी येणार खर्च. वाचा सविस्तर-

हेल्थ- एका रिपोर्टनुसार, 2020 मध्ये आरोग्य क्षेत्रावर होणाऱ्या सायबर अटॅकमध्ये तब्बल 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर-

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण:  ATSनं असा केला क्राइम सीन, वाचा सविस्तर

सायटेक आता लवकरच Twitterमध्ये शॉपिंगचे फिचर येणार आहे. म्हणजेच आता तुम्ही Twitter वरूनही शॉपिंग करू शकणार आहात. वाचा सविस्तर-

चेन्नई- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका लहान मुलाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. वाचा सविस्तर-

राशिभविष्य-आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १२ मार्च २०२१. वाचा सविस्तर-

अग्रलेख : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनावर अखेर पडदा पडल्यानंतर या अधिवेशनाने सर्वसामान्य जनतेला नेमके काय दिले, असा प्रश्न निर्माण झाला. वाचा सविस्तर-

पुणे- एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर-

ढिंग टांग : खेला होबे!. वाचा सविस्तर-

आग्रा- महाशिवरात्रीचे निमित्त साधून अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी ताजमहलमध्ये भगवान शंकराची पूजा केल्याचा प्रकार घडला आहे. वाचा सविस्तर-

loading image