
ब्रिस्टेबनमधील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणे याने प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती म्हणून आपलं शेवटचं भाषण केलं आहे. महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
मराठा आरक्षणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ड्रॅगन फ्रूटचे नाव बदललं आहे. ब्रिस्टेबनमधील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणे याने प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती म्हणून आपलं शेवटचं भाषण केलं आहे. अलिबाबा कंपनीचे संस्थापक जॅक मा तीन महिन्यानंतर पुन्हा जगासमोर आले आहेत.
नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील सुनावणी आज झाली. या सुनावणीमध्ये सर्व पक्षकारांच्या वकिलांनी 'सुनावणी ऑनलाईन न होता ती प्रत्यक्षात व्हावी', अशी मागणी केली. यानुसार, सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय दोन आठवड्यांनंतर दिले जातील, असे स्पष्ट केले. सविस्तर वाचा
गांधीनगर : देशात शहरांची नावं बदलण्याची मोहिम जोरदार सुरु आहे. सध्या महाराष्ट्रात औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने याआधीच अनेक शहराची नावं बदलली आहेत. त्यातच आता भाजपची सत्ता असलेल्या राज्यामध्ये एका फळाचे नाव बदलण्यात आलं आहे. सविस्तर वाचा
नवी दिल्ली : जगातील तिसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अलीबाबा समूहाचे मालक जॅक मा मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. ते आता समोर आले आहेत. बुधवारी जॅक मा यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 100 शिक्षकांशी बातचित केली. सविस्तर वाचा
पुणे : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हा आपल्यासाठी नेहमीच चर्चेचा, अभ्यासाचा आणि उत्सुकतेचा विषय असतो. पण, या निवडणुकीत पुण्यातील युवा कलाकाराने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का सविस्तर वाचा
पुणे : तुम्ही खवय्ये आहात का? तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडते का? तुम्हाला रॉयल एनफिल्डची बुलेट हवीये का? मग तुमच्यासाठी एक भन्नाट संधी आहे. तुम्हाला फक्त बुलेट थाली संपावायची आहे आणि रॉयल एनफिल्ड घरी घेऊन जायची आहे. सविस्तर वाचा
भारतीय संघाने 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला जाग्यावर आणले होते. ही परंपरा कार्यवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेनं कायम ठेवली. त्याने नव्या दमाच्या खेळाडूंसह मालिका जिंकून दाखवली. सविस्तर वाचा
"स्पॅनिश सुपर कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बार्सिलोनाचा सुपर स्टार लियोनेल मेस्सी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला नडल्याचे पाहायला मिळाले होते. सामना अखेरच्या टप्प्यात असताना त्याने अशोभनिय कृत्य केले. यावेळी त्याला मॅच रेफ्रींनी रेड कार्ड दाखवत बाहेरचा रस्ता दाखवला. सविस्तर वाचा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली राष्ट्राध्यक्ष पदाची जागा सोडताना अनेक गोंधळ घातलेले पहायला मिळाले. आज अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन शपथ घेणार आहेत. सविस्तर वाचा
मुंबई : वादग्रस्त टिपू सुलतान याचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी शिवसेनेने सुरु केल्याचा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. सत्तेसाठी शिवसेना पुरती लाचार झाल्याची टीका त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा
मुंबई : तांडव मालिकेवरुन चाललेला वाद अजून पुरता मिटलेला नाही. या मालिकेच्या दिग्दर्शकानं माफी मागितल्यानंतरही भाजपच्या काही नेत्यांकडून ही मालिका बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तांडव चा विषय ट्रेडिंग होत आहे. सविस्तर वाचा