Crime News: झाड पडल्यामुळे..., बायको दीरासोबत गेली पळून, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल

महिलेच्या पतीने भावाविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.
Crime News
Crime NewsSakal

Bihar Crime News: बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून तीन मुलांची आई आपल्या दीरासोबत पळून गेली आहे. 2021 मध्ये एका अपघातात महिलेच्या पतीचा पाय मोडला होता, त्यानंतर महिला आणि तिचा दीर एकमेकांच्या जवळ आले.

आता दोघेही फरार झाले आहेत. याप्रकरणी पतीने आपल्या भावाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने भावाविरुद्ध सानोखर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने 6 वर्षांपूर्वी गोड्डा, झारखंड येथील रहिवासी अंगूरी खातूनसोबत लग्न केले होते. 2021 मध्ये झाडावरून पडल्याने त्याचा पाय मोडला. 29 मे 2023 रोजी तीन मुले सोडून महिला दीर मोहम्मद सत्रुद्दीन (36) सोबत पळून गेली.

झाडावरून पडल्याने पाय तुटला:

महिलेचा पती कुद्रतुल्ला याने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या तीन वर्षांपासून दोघांमध्ये सर्व काही ठीक होते. या काळात तीन मुलांचाही जन्म झाला. 2021 मध्ये आंब्याच्या झाडावरून पडल्याने दोन्ही पाय मोडले.

Crime News
POCSO Act : "पॉक्सो कायद्यात बदल करा"; अयोध्येतील महंत-साधू ब्रिजभूषण यांच्यासाठी एकवटले

आर्थिक परिस्थितीमुळे उपचार होऊ शकले नाहीत, चालताना त्रास होऊ लागला. घरची परिस्थितीही बिकट होऊ लागली, यादरम्यान पत्नी आणि लहान भावामध्ये जवळीक वाढू लागली. 29 मे 2023 रोजी दोघेही घरातून पळून गेले.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत:

पत्नी आणि लहान भाऊ दोघेही लग्न करणार आहेत असेही महिलेच्या पतीकडून सांगण्यात आले. दोघांच्या लग्नाला लोकांनी विरोध केला, मौलवींनीही लग्न लावण्यास नकार दिला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

Crime News
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com