Lok Sabha Election 2024 :  डाव्या हाताला तर्जनी नसेल, दोन्ही हात नसतील तर निवडणुकीची शाई कुठे लावतात?

मतदानावेळी बोटाला शाई का लावली जाते?
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal
Updated on

Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी दणक्यात सुरू आहे. निवडणूक हा एक संपूर्ण कार्यक्रम असून त्यात मतदान हा महत्त्वाचा भाग आहे. मतदानादिवशी लोकांची नावे योग्य आहेत का ते तपासून मग त्यांना मतदान कक्षात सोडले जाते. (Lok Sabha Election 2024)

मतदान करण्याआधी मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते. त्यावरून व्यक्तीने मतदान केले आहे की नाही हे लक्षात येते. ज्यामुळे बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला ओळखता येते.

Lok Sabha Election 2024
Loksabha election 2024 : राजघराण्यातील व्यक्ती ‘सत्ते’पासून दूरच; राजकीय पक्षांनी का डावललं?

मतदानावेळी बोगस मतदान करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर पोलिस बंदोबस्त असतो. तसेच, शाई लावल्यानेही बोगस मतदार ओळखता येतात. त्यामुळे मतदान प्रक्रियेत शाई महत्त्वाची भुमिका पार पाडते.

अशी ही शाई मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीला लावली जाते. लोक मतदान केल्यानंतर अभिमानाने आम्ही मतदान केले असे बोट दाखवत सेल्फीही काढतात. पण समजा एखाद्या व्यक्तीच्या डाव्या हाताला तर्जनीच नसेल तर काय करतात. किंवा एखाद्या व्यक्तीचे दोन्ही हात अपघातात गेले असतील. तर त्याच्यासाठी निवडणुकीचा नियम काय आहे, याबद्दल जाणून घेऊयात.  

Lok Sabha Election 2024
Kalyan Loksabha Election : महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांच्या सारथी बनल्या सुलभा गायकवाड

व्यक्तीच्या डाव्या हाताला तर्जनी नसेल तर, निवडणूक घेणे नियम १९६१ च्या नियम के ४९ नुसार, व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही इतर बोटाला शाई लावता येते.

जर त्या व्यक्तीच्या डाव्या हाताला एकही बोट नसेल, तर त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावली जाते. त्या व्यक्तीला उजवी तर्जनीही नसेल, तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.  

मतदान करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला दोन्ही तळहात नसतील. तळहातावर बोटे नसतील, तर त्याचा हात जिथून दुखावला गेला आहे त्या टोकाला शाई लावली जाते.

Lok Sabha Election 2024
Loksabha Election 2024 : राणा दाम्पत्याने घेतली अडसूळ यांची भेट, नाराजी दूर झाल्याची चर्चा

एखाद्या व्यक्तीचा अपघाताला कोपराएवढे हात गेले असतील, किंवा जन्मत: कोपराएवढेच हात असतील तर तिथे शाई लावली जाते.   

या लोकांना लावली होती बोटभर शाई

२०१९ मध्ये महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावातील लोकांच्या तर्जणीला संपूर्ण शाई लावली होती. कारण, या गावातील लोकांनी तेलंगणा आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यात मतदान केले होते. त्यामुळे २०१९ मध्ये या लोकांच्या बोटाला केवळ ठिपका नाहीतर शाईची संपूर्ण रेष ओढण्यात आली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com