Madhavi Latha Viral Video
Madhavi Latha Viral VideoEsakal

Madhavi Latha: व्हायरल व्हिडिओ ठरणार डोकेदुखी? ओवेसींना भिडणाऱ्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्याविरोधात गुन्हा

Viral Video: गुन्हा दाखल करणे हे हास्यास्पद आहे. लोकांना मला टार्गेट करायचे आहे. रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीनंतर हे लोक मला घाबरायला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या हैदराबादच्या उमेदवार के माधवी लता यांच्या विरोधात एफ आयआर नोंदवण्यात आला आहे. हैदराबादमध्ये एमआयएमच्या ओवेसी बंधूंना माधीवी लता सातत्याने आव्हान देत

रामनवमीच्या मिरवणुकीतहातवारे करत मशिदीकडे काल्पनिक बाण सोडण्याचा इशारा माधवी लता यांनी केला होता. यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याचे म्हणत माधवी लता यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे., पोलिसांनी सांगितले.

या घटनेचा कथित व्हिडिओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. (FIR On Madhavi Latha)

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी याचा खरपूस समाचार घेतला आहे.

माधवी लता म्हणाल्या की, जर मी मुस्लिमांच्या विरोधात असते तर रमजानच्या पवित्र महिन्यात हजरत अली साहिबच्या मिरवणुकीत का सहभागी झाली असती? मी स्वतःच्या हाताने त्यांना अन्न का वाटेल असते? गुन्हा दाखल करणे हे हास्यास्पद आहे. लोकांना मला टार्गेट करायचे आहे. रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीनंतर हे लोक मला घाबरायला लागले आहेत.

Madhavi Latha Viral Video
Sangli Loksabha Constituency : विशाल पाटील भिडणार की ‘ऑफर’ घेणार? ; सबंध राज्याचे लक्ष

रामनवमीची मिरवणूक होती. माझ्याकडे धनुष्य नव्हते. माझ्याकडे बाण नव्हते. त्यांनी बनावट व्हिडिओ बनवला आणि एफआयआर दाखल केला.

काहीजण म्हणत आहेत की, मी मुस्लिमांना भडकवले आहे. मी जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न केला. पण हे असे नाही तो उत्सवाचा प्रसंग होता. मी रस्ता ओलांडत होते. तुम्ही माझा किंवा तिथे उपस्थित असलेल्या कोणाचाही व्हिडिओ पाहू शकता, कोणत्याही फ्रेममध्ये मशीद नाही. व्हिडिओ प्रसारित करून नकारात्मकता पसरवली जात आहे. मी स्पष्ट करते की हा एक अपूर्ण व्हिडिओ आहे.

Madhavi Latha Viral Video
S . Chokkalingam : मतदारांना आवश्यक सुविधा पुरवा ; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

माधवी लता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, लता कथितरित्या हैदराबादमधील एका मशिदीकडे हातवारे करत बाण सोडत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ रामनवमीच्या मिरवणुकीचा आहे.

हैदराबादच्या फर्स्ट लान्सरमध्ये राहणाऱ्या शेख इम्रान यांनी वादग्रस्त व्हिडिओवरून माधवी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

इम्रान यांनी बेगम बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हे प्रकरण निवडणूक आयोगाकडेही नेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com