'या' राज्याने हटवले कोरोनासंबंधी सगळे नियम; पुर्वीसारख्याच घडणार घडामोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik unlock

'या' राज्याने हटवले कोरोनासंबंधी सगळे नियम; पुर्वीसारख्याच घडणार घडामोडी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Madhya pradesh Covid Guidelines: मध्य प्रदेश सरकारने कोरोना महासाथीचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या सगळ्या प्रतिबंधाना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील कोरोना परिस्थिती आता संपूर्ण नियंत्रणात असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. मध्य प्रदेशातील कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात असून एकूण 78 ऍक्टीव्ह रुग्ण सध्या राज्यात आहेत, त्यामुळे महासाथी दरम्यान लागू करण्यात आलेले सगळे निर्बंध आता शिथिल करत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

हेही वाचा: '24 तासांत हजर व्हा, अन्यथा...'; 2296 एसटी कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम

त्यांनी म्हटलंय की, सगळे सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक सभांना संपूर्ण क्षमतेसह आयोजन करण्याची परवानगी असेल. मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात आता सण-समारंभ, विवाह, अंतिम संस्कार आणि इतरही सर्व प्रकारचे सोहळे आता कसल्याही प्रतिबंधांशिवाय आयोजित केले जाऊ शकतात.

शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलंय की, नाईट कर्फ्यू आता आज रात्रीपासून हटवला जाईल. सिनेमा थिएटर्स, मॉल्स, स्वीमिंग पूल्स, जिम, योगा सेंटर, रेस्टॉरंट्स, क्लब्स, शाळा, कॉलेज, हॉस्टेल्स आणि कोचिंग क्लासेस सुद्धा 100 टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील.

हेही वाचा: तालिबानमुळे अफगाणिस्तान क्रिकेट धोक्यात, ICC ने घेतला मोठा निर्णय

मात्र, याचा अर्थ कोरोना नियमावलीचं पालन करु नये, असं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केलंय की, कोरोनाशी निगडीत नियमावलीचं पालन करुनच अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं पाहिजे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग नेहमीप्रमाणे अनिवार्यच असणार आहे. मात्र, सगळे दुकान मालक, 18 वर्षे वयावरील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि इतर ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनाही संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

loading image
go to top