
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या पासून सुरुवात होत असून, या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे विषय चर्चेसाठी मांडले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दुपारी 12 वाजता विधान भवनात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे विरोधकांच्या रणनीतीत उत्सुकता निर्माण झाली असून, सरकारविरोधात ठोस भूमिका मांडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.