मालेगाव स्फोट: कर्नल पुरोहितला जामीन मंजूर

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुरोहित गेल्या नऊ वर्षांपासून तुरुंगात आहे. मात्र, अद्याप त्याच्याविरुद्ध आरोप निश्‍चित करण्यात आले नसल्याने जामीन मिळावा, असे पुरोहितचे वकील हरिश साळवे यांनी सुनावणीदरम्यान नमूद केले होते. त्यानुसार त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. 

नवी दिल्ली : 2008 मधील मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याला आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. पुरोहित विरोधातील मोक्का न्यायालयाने याआधीच हटविला आहे.

प्रसाद पुरोहित याने अंतरिम जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जामीन मंजूर केला. कर्नल पुरोहित हा गेल्या 9 वर्षांपासून कारागृहात होता. न्यायाधीश आर. के. अग्रवाल आणि न्यायाधीश ए. एम. सप्रे यांच्या खंडपीठाने आज जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जामीन देण्यास विरोध केला होता. 

पुरोहित यांच्याविरुद्ध अजूनपर्यंत योग्य पद्धतीने आरोप निश्चितीही झाली नाही. जे आरोप सध्या त्यांच्याविरोधात आहेत, त्यात पुरोहित यांना किमान सात वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्यापेक्षा जास्त कालावधी त्यांनी तुरूंगात घालवला आहे. उच्च न्यायालयाकडून जामीन अर्जावर सुनावणी घेताना प्रथमदर्शनी चूक झाल्याचे जाणवते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. ज्येष्ठ वकील हरिष साळवी यांनी पुरोहितच्या वतीने याच मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता. तो न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे. 

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने पुरोहितचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने प्रज्ञासिंह ठाकूरला दिलेल्या जामिनाला या स्फोटात मरण पावलेला निसार अहमद हजी सैय्यद बिलाल याच्या वडिलांनी या जामिनाला आव्हान दिले होते. प्रज्ञासिंह ठाकूर या शक्तीशाली महिला असून, त्या या प्रकरणातील पुराव्यांवर प्रभाव टाकतील, असे त्यांचे म्हणणे होते. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या स्फोटात सात जण ठार झाले होते. 

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Malegaon blast case: Supreme Court grants bail to Lt Colonel Purohit