रक्षकच बनला भक्षक! सुरक्षा रक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिल्लीतील वसंत कुंज परिसरात एका मतिमंद अल्पवयीन मुलीवर सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Girl Sexually Abused in Delhi
Girl Sexually Abused in DelhiEsakal

दक्षिण-पश्चिम दिल्लीतील (Delhi) वसंत कुंज परिसरात एका १६ वर्षीय मतिमंद मुलीवर (mentally challenged girl) सुरक्षा रक्षकाने (Security Guard) बलात्कार (Sexually Abused) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मतिमंद मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. फोस्टर केअर सेंटर 'गार्डन केअर'च्या वरिष्ठ व्यवस्थापकाने सोमवारी याबाबत तक्रार दाखल केली असून, सेंटरमध्ये राहणाऱ्या एका मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली होती. (A 16-year-old mentally challenged girl was allegedly raped by a security guard in South-West Delhi's Vasant Kunj area.)

Girl Sexually Abused in Delhi
तरुणाकडून मैत्रीणीवर बलात्कार

पोलिस उपायुक्त (दक्षिण पश्चिम) गौरव शर्मा यांनी सांगितले की, पीडित मतिंमद मुलीला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की, गार्डन केअर'च्या व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, केअर सेंटरच्या सुरक्षा रक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे.

Girl Sexually Abused in Delhi
फेसबुकवर मैत्री..त्यानंतर बलात्कार; न्यायालयाने सुनावली आरोपीला २० वर्षांची शिक्षा

यानंतर वसंत कुंज दक्षिण पोलिस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे डीसीपी म्हणाले. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींने इतर मुलींशी दुष्कृत्य केलं आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणानंतर पोलिस इतर मुलींचे समुपदेशन करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com