खून प्रकरणातील पुरावे घेऊन माकड गेलं पळून; पोलिसांची कोर्टात नाचक्की | Monkey ran with evidence of murder case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkey ran away with the evidence of the murder case
खून प्रकरणातील पुरावे घेऊन माकड गेलं पळून; पोलिसांची कोर्टात नाचक्की | Monkey ran with evidence of murder case

खून प्रकरणातील पुरावे घेऊन माकड गेलं पळून; पोलिसांची कोर्टात नाचक्की

पोलिसांनी एका हत्या प्रकरणातील आरोपींना अटक केली, पुरावेसुद्धा गोळा केले. परंतु जेव्हा कोर्टात पुरावे सादर करण्याची वेळ आली, तेव्हा पोलिसांनी सांगितलेलं कारण एकूण सारेच आश्चर्यचकीत झाले. माकडाने हत्येचे पुरावे चोरल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या पुराव्यांमध्ये चाकूचाही समावेश होता, ज्याच्या सहाय्याने ही हत्या करण्यात आली होती.

2016 मध्ये झाला होता खून-

राजस्थानातील जयपूर येथील कनिष्ठ न्यायालयातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण सप्टेंबर 2016 चे आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्यावेळी चांदवाजी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शशिकांत शर्मा यांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. (Monkey ran away with the evidence of the murder Case; Jaipur Police's answer in the court)

हेही वाचा: पत्नीचे पतीसमोरच प्रियकराशी शारीरिक संबंध; संतापलेल्या पतीने...

पोलिसांनी केली आरोपींना अटक-

मृतदेह सापडल्यानंतर मृताच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांनी जयपूर-दिल्ली महामार्ग रोखून धरला आणि या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी केली. पाच दिवसांनंतर या प्रकरणी पोलिसांनी चांदवाजी येथील राहुल कंडेरा आणि मोहनलाल कंडेरा यांना अटक केली. पोलिसांनी दोघांनाही हत्येच्या आरोपावरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात हजर केले होते.

हेही वाचा: पत्नीच्या डोळ्यादेखत पतीची हत्या; आंतरजातीय विवाह केल्याचा राग

माकडाने पळवले पुरावे-

पोलिस या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे एका बॅगेत ठेवून न्यायालयात घेऊन जात होते, असे सांगितले जाते. हत्येत वापरण्यात आलेल्या चाकूसोबतच इतर 15 महत्त्वाचे पुरावेही बॅगेत ठेवण्यात आले होते. पुराव्याने भरलेली पिशवी झाडाखाली ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतंच न्यायालयाने या प्रकरणी पुरावे सादर करण्यास सांगितले असता पोलिसांनी ही बॅग माकडाने चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी ही बाब न्यायालयात लेखी दिली आहे.

Web Title: Monkey Ran Away With The Evidence Of The Murder Case Jaipur Polices Answer In The Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top