

monsoon arrival forecast Kerala and Maharashtra
esakal
Monsoon favorable conditions over Arabian Sea : केरळ किनारपट्टी, दक्षिण कर्नाटकचा किनारी भाग आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात आज (ता.३०) शनिवारी सकाळी ढगांचा मोठा समूह तयार झाल्याचे उपग्रह निरीक्षणांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मॉन्सून पावसाला वेग मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या बीएफएस मॉडेलनुसार ४ ते ७ जूनदरम्यान पश्चिम किनारपट्टीवर सलग पावसाची शक्यता असून हा पाऊस उत्तरेकडे सरकण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रगतीकडे हवामान तज्ज्ञांसह शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे.