भाजप नेते मंगलप्रभात लोढांविरोधात पुण्यात गुन्हा ते महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा चिघळला, महत्त्वाच्या बातम्या क्लिकवर

Morning Update News Maharashtra Karnataka ST PM Modi BJP Mumbai Pune Corona
Morning Update News Maharashtra Karnataka ST PM Modi BJP Mumbai Pune Corona

महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक. खूशखबर ! 60 वर्षांवरील व्यक्तींना मोदी सरकार देणार महिन्याला 3000 रुपये, अशी करा नोंदणी. भाजपमध्ये गेला म्हणून नाटकातून डच्चू. ​ धमकीचा मोबाईल सापडलेल्या सोनूचा दादर स्फोटांमध्ये सहभाग. मुंबईकरांनो काळजी घ्या, लोकलपेक्षाही जलदगतीने 'या' ठिकाणांहून पसरतोय कोरोना. सक्रिय रुग्णसंख्येत देशात जळगाव आठवे; स्थिती नियंत्रणाबाहेर. डिझेल दरवाढीचा एसटीच्या मालवाहतुकीवरही परिणाम, आता लागू झाले नवीन भाडे. प्रत्येक विद्यापीठात आता आदिवासी वसतिगृहे; आयुक्तालयामार्फत लवकरच प्रस्ताव. औरंगाबादमध्ये रोज वाढतायेत सहाशेपेक्षा जास्त रुग्ण

कोल्हापूर : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल भ्याड हल्ला केला होता. तसेच शिवसेना फलक व वाहनाला काळे फासण्यात आले होते. या पार्श्वभूमीवरती कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये वाद चिघळला आहे. वाचा सविस्तर

पुणे : भाजपचे मुंबईचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात खंडणी आणि फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात शुक्रवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला. वाचा सविस्तर

नवी दिल्ली- PM Shram Yogi Mandhan Yojana: पुन्हा एकदा गरीब आणि ज्येष्ठ व्यक्तींना समोर ठेवून मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. वाचा सविस्तर

कोलकता - भारतीय जनता पक्षावरून पश्चिम बंगालमधील रणधुमाळीत आणखी एक नाट्य घडले आहे, जे प्रत्यक्ष नाट्य क्षेत्राशी संबंधित आहे. भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून एका कलावंताला नाटकातूनच काढून टाकण्यात आले.वाचा सविस्तर

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याची जबाबदारी स्विकारणारा जैश-उल-हिंद या संघटनेच्या नावाने आलेला टेलिग्राम संदेश हा तिहार कारागृह परिसरातून आल्याचे सायबर तपासणीत निष्पन्न झाले होते. वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या काही दिवसात उच्चभ्रु वस्त्या, उंच इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण वाढताना पाहायला मिळतायत. त्यामुळे लोकलपेक्षाही बाजार, लग्नसोहळे, पब यांसह इतर गर्दीच्या ठिकाणांमुळे कोविड पसरत असल्याचा अंदाज महानगर पालिकेचा आहे .वाचा सविस्तर

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर गेलाय. देशभरातील सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा आठवा क्रमांक आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार सक्रिय रुग्ण असलेल्या ‘टॉप टेन’ दहा जिल्ह्यांत राज्यातील आठ जिल्हे आहेत. वाचा सविस्तर

नागपूर : डिझेल दरवाढ होत असल्याने एसटी महामंडळात पुन्हा एकदा मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी असलेले किमान १०० किलोमीटरपर्यंतचे ४२ रुपये प्रतिकिलोमीटर भाडे आता ४६ रुपये केले. राज्यात आठ मार्चपासून एसटीच्या मालवाहतुकीचे नवीन भाडे लागू झाले आहे. वाचा सविस्तर

नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक विद्यापीठामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सुविधांनी युक्त असे शासकीय वसतिगृह साकारणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी ‘सकाळ’ला सांगितले. वाचा सविस्तर

औरंगाबाद: जिल्ह्यातील नवीन कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यात औरंगाबादचा समावेश आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 617 नवीन रुग्णाचं निदान झालं आहे.  वाचा सविस्तर

अभिनेत्री श्रुती मराठे नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी साडीतील पारंपरिक लूक तर कधी वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट करणाऱ्या श्रुतीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com