ओमिक्रॉनचा धोका वाढला, केंद्र सरकारचा महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय

RTPCR test Caution required in the process Omicron of corona infection omicron in India
RTPCR test Caution required in the process Omicron of corona infection omicron in Indiasakal

जगभरातील 110 देशांमध्ये ओमिक्रॉन परसल्याने सर्वांची चिंता वाढली आहे. यातच भारतात ऑमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 418 वर गेली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या टीम्स अॅक्टिव्ह झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टास्क फोर्सची (Task Force) बैठक घेतली. याच वेळी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही बैठक घेतल्यानंतर राज्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. (Night Curfew in Maharashtra)

दरम्यान, महाराष्ट्राबाबत केंद्र सारकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या वतीने महत्वाच्या 10 राज्यांमध्ये नियमांचं पालन होत आहे की नाही, याच्या निरीक्षणासाठी टीम्स पाठवण्यात आल्या आहेत. ही पथकं ओमिक्रॉनच्या संदर्भातील परिस्थितीबाबत केंद्राकडे डेटा पाठवतील. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून (Mansukh Mandiviya) यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. (Multi-disciplinary Central teams to be deployed in maharashtra)

यापैकी काही पथकं ओमिक्रॉन (Omicron) प्रकरणांची वाढती संख्या नोंदवत आहेत. तसेच लसीकरणाच्या गतीसंदर्भात डेटा पुरवणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. (Indian Health MInistry)

केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये बहु-अनुशासनात्मक टीम्स तैनात करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने केली आहे. (Omicron in India)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com