
आता याला हिंदू जिहाद म्हणावं का? मुस्लिम तरुणीने धर्मांतर करत हिंदू मुलाशी केलं लग्न, म्हणाली...
Muslim Girl Converted : बरेलीमध्ये गुरुवारी संध्याकाळी 19 वर्षीय मुस्लिम तरुणीने हिंदू धर्म स्वीकारला. इलमा खान असणारी तरुणी सौम्या शर्मा झाली. तरुणीने तिचा प्रियकर सोमेश शर्मासोबत मंदिरात लग्न केले आहे.
बरेली येथील ऑगस्ट मुनी आश्रमात, पंडित के के शंखधर यांनी हिंदू पद्धतीने लग्न लावून दिले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी ही मुलगी घरातून निघून गेली होती. मुलीने सांगितले की, मी आता आयुष्यभर हिंदूच राहणार आहे.
बदाऊन जिल्ह्यातील बिलसी पोलीस स्टेशन हद्दीतील पारोली गावात राहणारी इलमा उर्फ सौम्या हिने सांगितले की, मी 10वी पास आहे.
सध्या कागदपत्रांनुसार मला १९ वर्षे पूर्ण आहेत. मुलीने सांगितले की, हा माझा स्वतःचा निर्णय आहे आणि मी प्रौढ आहे. मला धर्मांतर करून स्वतःच्या मर्जीने लग्न करण्याचा अधिकार आहे.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Muslim Girl
मला दहावीनंतरही शिक्षण घ्यायचे होते, मात्र घरच्यांनी शिकवण्यास नकार दिल्याचे मुलीने सांगितले. शाळेत असतानाच गावातील सोमेश शर्मा याच्याशी तिची मैत्री झाली. सोमेश दिल्लीत खासगी नोकरी करतो.
मुलीने सांगितले की, माझं लग्न झालं आहे. माझ्या घरचे मला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, मुलगी तिचे घर सोडून प्रियकर सोमेशसोबत प्रथम प्रयागराजला गेली. तरुणीनेही तिच्या प्रियकरासोबत लग्नाची नोंदणी केली आहे.
हेही वाचा: Sharad Yadav Passed Away : तब्बल 25 वर्षाचं वैर संपवून मोदींचा पराभव करण्यासाठी शरद-लालू आले होते एकत्र!
पंडित केके शंखधर यांनी गेल्या 9 वर्षात 66 मुस्लिम मुलींची हिंदू मुलांशी लग्न लावून दिली आहे. गेल्या 40 दिवसांत पंडित यांनी 4 मुलींची लग्ने लावली आहेत. मलाही लोक धमक्या देतात, असे पंडित म्हणतात.
गेल्या महिन्यात मला धमकी देण्यात आली होती, तरुणीने सांगितले की, मी आता माझ्या प्रियकरासह गावी जाणार नाही. पण आता सोमेश माझा प्रियकर नसून माझा नवरा आहे.