Muslims in India: देशात मुस्लिमांची लोकसंख्या किती? स्मृती इराणींनी संसदेत सांगितली आकडेवारी

Muslims in India
Muslims in India
Updated on: 

Muslims in India: भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येबाबत जगभरातील देशांच्या आकडेवारीत भारताने चीनला मागे टाकले होते आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला होता. अशा स्थितीत केवळ मुस्लिम लोकसंख्येबाबत भारत सरकारने आकडेवारी सादर केली आहे.

पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या माला रॉय यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी मुस्लिमांची लोकसंख्या 2011 (जनगणना 2011) मध्ये 17.2 करोड वरून 2023 मध्ये 19.7 करोड होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. यादरम्यान त्यांनी देशातील मुस्लिमांची साक्षरता आणि श्रम यांच्याशी संबंधित आकडेवारीही सांगितली. विशेष म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते. (Muslims in India)

Muslims in India
Khalapur Landslide Rescue Operation: इर्शाळवाडीत बचावकार्याला पुन्हा सुरूवात! 16 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती

तृणमूल काँग्रेसच्या माला रॉय यांनी संसदेत तीन प्रश्न विचारले. '31 जुलै 2023 पर्यंत मुस्लिम लोकसंख्येचा काही डेटा आहे का?', 'पसमांदा मुस्लिमांच्या लोकसंख्येची काही आकडेवारी सरकारकडे आहे का?', '31 जुलै 2023 पर्यंत पसमांदा मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीबद्दल काही माहिती आहे का?', असे प्रश्न माला रॉय यांनी विचारले. यावर  स्मृती इराणी यांनी उत्तर दिले आहे.

मंत्री इराणी म्हणाल्या, 2011 च्या जनगणनेनुसार मुस्लिम लोकसंख्या 17.22 कोटी होती, जी देशाच्या लोकसंख्येच्या 14.2 टक्के होती. लोकसंख्येच्या अंदाजांवरील तांत्रिक गटाच्या जुलै 2020 च्या अहवालानुसार, 2023 मध्ये देशाची लोकसंख्या 138.82 कोटी असल्याचा अंदाज आहे. 2011 च्या जनगणनेप्रमाणे 14.2 टक्के इतकेच प्रमाण लागू केल्यास, 2023 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 19.75 कोटी असल्याचा अंदाज आहे.

Muslims in India
Ram Mandir Ayodhya : राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम जवळपास पूर्ण; समोर आले नवीन फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com