PM मोदींची संपत्ती किती? वर्षभरात किती वाढ? पीएमओ जाहीर केली आकडेवारी

नरेंद्र मोदींची बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक नाही
Narendra Modi Wealth Latest News
Narendra Modi Wealth Latest NewsNarendra Modi Wealth Latest News

Narendra Modi Wealth Latest News नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची संपत्ती (Wealth) जाहीर केली आहे. तसेच अन्य दहा मंत्र्यांचीही संपत्ती जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत वर्षभरात २६ लाखांनी वाढ झाली आहे. पीएमओने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पंतप्रधानांकडे एकूण २.२३ कोटींची संपत्ती आहे. यातील बहुतांश बँकांमध्ये ठेवी आहेत.

पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) वेबसाइटवर दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. कारण, त्यांनी गांधीनगरमधील त्यांच्या वाट्याची जमीन दान केली होती. नरेंद्र मोदींची बाँड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक नाही. परंतु, त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची एकूण किंमत १.७३ लाख आहे.

Narendra Modi Wealth Latest News
Bihar : नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मोदींच्या (Narendra Modi) मालमत्तेत (Wealth) वर्षभरात २६.१३ लाखांनी वाढ झाली आहे. परंतु, त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. ३१ मार्च २०२२ पर्यंत मोदींकडे एकूण २,२३,८२,५०४ रुपयांची मालमत्ता आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना निवासी जमीन खरेदी केली होती. ती इतर तीन लोकांच्या संयुक्त मालकीची होती. त्यात सर्वांचा समान हिस्सा होता.

ताज्या माहितीनुसार, ‘रिअल इस्टेट सर्व्हे नंबर ४०१/ए वर तीन अन्य लोकांची संयुक्त भागीदारी होती. प्रत्येकाचा २५ टक्के हिस्सा होता. ही २५ टक्के रक्कम त्यांच्या मालकीची नाही. कारण, ती दान केली गेली आहे.’ पंतप्रधानांकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत एकूण ३५,२५० रुपये रोख रक्कम आहे. पोस्ट ऑफिसमध्ये ९,०५,१०५ रुपये किमतीची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आहेत. तसेच १,८९,३०५ रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.

Narendra Modi Wealth Latest News
नितीश कुमार अस्वस्थ; उद्धव ठाकरेंची स्थिती, नड्डांच्या वक्तव्याने वाटू लागली भीती!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे ३१ मार्च २०२२ पर्यंत २.५४ कोटी रुपये आणि २.९७ कोटींची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, आरके सिंग, हरदीप सिंग पुरी, पुरुषोत्तम रुपाला आणि जी रेड्डी यांच्यासह मोदी मंत्रिमंडळातील सर्व २९ सदस्यांमधील स्वतःची आणि अवलंबितांची संपत्ती जाहीर केली आहे. माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही गेल्या आर्थिक वर्षातील संपत्ती जाहीर केली आहे. जुलैमध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com