पाक सैन्याकडून 1 जूनपासून नवव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

पाकिस्तानी सैन्याने आज (सोमवार) सकाळीही पुँच जिल्ह्यातील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एकही जवान जखमी झालेला नाही. 

जम्मू - पाकिस्तानी सैन्याकडून काश्मीर खोऱ्यात 1 जूनपासून नवव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे. तर, गेल्या 72 तासांत सहाव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

पाकिस्तानी सैन्याने आज (सोमवार) सकाळीही पुँच जिल्ह्यातील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात एकही जवान जखमी झालेला नाही. 

पाक सैन्याकडून रविवारीही पुँच जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लष्कराच्या चौक्या व गावांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. पाकिस्तानी सैन्याकडून तोफगोळे आणि अत्याधुनिक शस्त्रांमधून गोळीबार करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत एलओसीवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करत असलेल्या 13 दहशतवाद्यांना जवानांनी ठार मारले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
विजय मल्ल्यांची 'चोर, चोर' म्हणत उडविली हुर्यो​
बीड: बिंदुसरेवरील पर्यायी रस्ताही गेला वाहून
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता
#स्पर्धापरीक्षा - 'उडान योजना'​
पुण्यातील ‘ग्रॅंड’ गणेशोत्सव पर्यटनाचा ‘ब्रॅंड’ व्हावा!​
‘राहुल चमू’समोर मोठे आव्हान​
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी​

Web Title: National news Ninth ceasefire violation by Pakistan since June 1st