राममंदिराला ट्रस्ट, मशिदीसाठी का नाही? शरद पवारांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र!

टीम ई-सकाळ
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नाही. बेरोजगारांना भत्ता देण्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरीही याबाबत कोणतीही शाश्वती नाही.

लखनऊ : ''अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावं, असा सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यावर त्या जागी राम मंदिराच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला. त्यासाठी केंद्र सरकारकडून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापना करण्यात आली. मात्र, जर तुम्ही राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवू शकता, तर मशिद बनवण्यासाठी ट्रस्ट का नाही बनवू शकत?,'' असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लखनऊ येथील रविंद्रालयात बुधवारी (ता.१९) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. तर दुसरीकडे राम मंदिर ट्रस्टची पहिली बैठक आजच पार पडली. 

- "गुलशन कुमार यांची हत्या होणार हे ठाऊक होतं" राकेश मारियांचा खळबळजनक खुलासा...

ते पुढे म्हणाले, देश तर सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे. मात्र, सरकार लोकांमध्ये धार्मिक गोष्टींवरून फूट पाडण्याचं काम करत आहे. फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. आणि लोकांनाही त्याची जाणीव झाली आहे. मतदार आता भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही. केंद्र सरकारनच्या सीएए आणि एनआरसी यामध्ये विविध त्रुटी आहेत. आणि सरकारने मुस्लीम अल्पसंख्यांकांकडे दुर्लक्ष केलं आहे. 

- ‘फत्तेशिकस्त’ने वाढवली महाराष्ट्राची शान; इंडियन आर्मीनं दिलं मानाचं स्थान!

उत्तर प्रदेश सरकारचाही त्यांनी समाचार घेतला. उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पावर टीका करताना ते म्हणाले, ''उत्तर प्रदेश सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नाही. बेरोजगारांना भत्ता देण्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरीही याबाबत कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील शेतकरी आणि तरुण यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.''

- 'त्या' नोटीशीवर इंदुरीकर महाराजांनी खुलासा सादर केला, पण...

... त्या गोष्टीचं दु:ख वाटतंय : सोमय्या

शरद पवारांनी केलेल्या टीकेवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणाले की, ''हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेसाठी फंड दिला जातो. पण शरद पवारांनी राम मंदिर आणि बाबरी मस्जिदबाबत केलेलं भाष्य योग्य नाही. त्यांनी बाबरची तुलना रामाशी केली, या गोष्टीचं दु:ख वाटतंय. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करतो. बाबरची तुलना श्रीरामाशी करणं चुकीचं आहे, आणि त्यांनी ती करू नये, अशी शरद पवारांना विनंती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP president Sharad Pawar criticized central government on Ram temple trust