'निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट म्हणजे सुरक्षेची 100 टक्के गॅरंटी नाही'

corona test.jpg
corona test.jpg

नवी दिल्ली- जर एखाद्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर असा व्यक्ती कोरोनाचा प्रसार करु शकत नाही असे म्हणता येईल का ? शास्त्रज्ञ या मताशी बिल्कूल सहमत नाहीत. कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सुरक्षित असण्याची कोणतीच हमी नाही, असे हे शास्त्रज्ञ म्हणतात. फक्त यामुळे खोटी आशा निर्माण होते. त्यामुळे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्या व्यक्तीने इतरांप्रमाणेच सावधानता बाळगली पाहिजे. 

'नेचर'च्या ताज्या अंकात प्रकाशित एका अहवालानुसार, अनेक देशांमध्ये लोक ऑफिसला जाण्यासाठी, समारंभ किंवा इतर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोरोना टेस्ट करतात आणि निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर निश्चित होतात, असे दिसून आलेले आहे. 

भारतातही हे दिसून आलेले आहे.व्हीआयपींच्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर प्रवेश मिळत आहे. अशावेळी समारोहात सर्वजण निगेटिव्ह रिपोर्ट असलेले आहेत म्हणजे सर्व सुरक्षित आहेत. त्यामुळे तिथे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नसल्याचे समजले जात आहे. 

'नेचर'ने लॉसएंजेल्सच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका बार्बरा फेरर यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, नकारात्मक अहवाल असलेले लोक कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे कारण ठरु शकतात. एखादा व्यक्ती गुरुवारी आरटीपीसीआरची चाचणी करतो. शनिवारी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. त्यामुळे तो एखाद्या समारंभात सहभागी होतो. पण वास्तवात तो कोरोनाने बाधित असू शकतो. निगेटिव्ह रिपोर्ट हा केवळ ती व्यक्ती गुरुवारी निगेटिव्ह होती. गुरुवारी सॅम्पल दिल्यानंतर ती व्यक्ती बाधित होऊ शकते. कदाचित शुक्रवारी तो संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असेल. अशात बुधवारी केलेल्या चाचणीत तो निगेटिव्ह येईल. 

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांचे मतही या अहवालाशी मिळते जुळते आहेत. ते म्हणतात की, कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर लक्षणे विकसित होण्यास 2 ते 4 दिवस लागतात. बाधा झाल्यानंतर पहिल्या दिवशी चाचणी केली तर रिपोर्ट 100 टक्के निगेटिव्ह येईल. लक्षणे जाणवू लागल्यानंतरही 38 टक्के चुकीचे निगेटिव्ह रिपोर्ट येतात. तर तीन दिवसांनंतर 20 टक्के चुकीचे निगेटिव्ह रिपोर्ट येऊ शकतात. पाचव्या दिवसानंतरच चाचणीत कोरोना विषाणू पकडणे शक्य होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com