esakal | आता मदरशांमध्येही शिकवलं जाईल गीता, रामायण आणि योग;अभ्यासक्रमात समावेश!

बोलून बातमी शोधा

madarsa.}

शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) प्राचिन भारतीय ज्ञान आणि पंरपराप्रकरणी 100 मदरशांमध्ये नवा अभ्यासक्रम सुरु केला जात आहे.

आता मदरशांमध्येही शिकवलं जाईल गीता, रामायण आणि योग;अभ्यासक्रमात समावेश!
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग (NIOS) प्राचिन भारतीय ज्ञान आणि पंरपराप्रकरणी 100 मदरशांमध्ये नवा अभ्यासक्रम सुरु केला जात आहे. हा अभ्यासक्रम नव्या शिक्षण नीतिचा  (New Education Policy) एक भाग आहे. एनआयओएसच्या 3,5 आणि 8 वर्गासाठी बेसिक कोर्सची सुरुवात करण्यात येईल. एनआयओएसच्या प्राचिन भारताच्या अभ्यासात जवळपास 15 कोर्स आहेत. यात वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, रामायण, गीतासह अन्य कोर्सचा समावेश आहेत. हे सर्व कोर्स 3,5 आणि 8 वी वर्गाच्या प्रारंभिक शिक्षणाच्या समान आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एनआयओएसच्या चेअरमन सरोज शर्मा यांनी म्हटलं की, आम्ही हा कार्यक्रम 100 मदरशांमध्ये सुरु करत आहोत. भविष्यात आम्ही यात 500 मदरशांचा समावेश करणार आहोत. 

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवार नोएडातील एनआयओएसच्या केंद्रीय मुख्यालयात स्टडी मटेरियल जारी केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, भारत प्राचिन भाषा, विज्ञान, कला, संस्कृती आणि परंपरेचा खजिना आहे. आता देशाच्या प्राचिन पंरपरा पुनर्जीवित करुन ज्ञानाच्या क्षेत्रात सुपरपॉवर बनण्यास आपण तयार आहोत. आम्ही या कोर्सचा लाभ मदरसा आणि जगात असणाऱ्या भारतीय समाजापर्यंत पोहोचवू. 

सेक्स स्कँडलमध्ये अडकला भाजपचा मंत्री; नोकरी मागणाऱ्या मुलीसोबतचा अश्लील...

एनआयओएस दोन राष्ट्रीय बोर्डपैकी एक आहे, जो प्रायमरी, सेकंडरी आणि सीनियर सेकंडरी स्तरावरील कोर्स ओपन आणि डिस्टेंस एज्यूकेशनच्या माध्यमातून करतात. याच्या योगाच्या कोर्समध्ये पंतजली, कृतासूत्र, योगसूत्र, व्यायाम, सूर्य नमस्कार, आसन प्राणायाम, तणाव दूर करण्यासाठी व्यायाम, स्मरण शक्ति वाढवणारा व्यायाम यांचा समावेश होतो. 

आईचा कोरोनामुळे मृत्यू ! मुलगा निघाला आत्महत्येसाठी, पण 'ते' दोघे...

विज्ञान कोर्समध्ये पाणी, हवा, वेद, उत्पत्तीचे सूत्र, पृथ्वी आणि नैसर्गिक संसाधनाच्या संबंधी विषय आहेत. एआयओएसच्या असिस्टेंड डायरेक्टर शोएब रजा खान यांचं म्हणणं आहे की, हा अभ्यासक्रम सर्वांसाठी उपलब्ध आहे. ओपन एज्यूकेशन अंतर्गत विद्यार्थी याची निवड करण्यासाठी स्वतंत्र असतील. हे अनिवार्य नाही.