Nirav Modi
Nirav ModiGoogle

नीरव मोदी येणार भारताच्या ताब्यात

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात आणण्यास मंजुरी मिळाली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मोदीच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर शुक्रवारी स्वाक्षरी केली.

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारातील आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात आणण्यास मंजुरी मिळाली आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी मोदीच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. ‘सीबीआय’च्या एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी याच्या देशातील आणि देशाबाहेरील मालमत्ता जप्त करण्याचा मार्गही मोकळा झाला होता.

‘पीएनबी’ बँकेत १४ हजार कोटींच्या गैरव्यवहारात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे. तो जानेवारी २०१८ मध्ये भारतातून फरारी झाला होता. मुंबईतील विशेष न्यायालयाने फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. मार्चमध्ये त्याला लंडन येथे अटक करण्यात झाली होती. तेव्हापासून तो नैऋत्य लंडनमधील वाँडवर्थ तुरूंगात आहे. नीरव मोदी फरारी झाल्यापासून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. लंडनमधील वेस्टमिनिस्टर न्यायदंडाधिकारी न्यायालयात ११ मे २०२० रोजी प्रथमच नीरव मोदी याच्‍या प्रत्यार्पणावरील खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. ही कायदेशीर लढाई दोन वर्षे सुरू होती.

ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीला भारताकडे सोपविण्याचा निर्णय २५ फेब्रुवारीला दिला होता. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांना यासंबंधीच्या आदेशावर आज शिक्कामोर्तब केले. गृहमंत्रालयाच्या या आदेशावर लंडनच्या उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी अर्ज करण्यासाठी त्याला १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Nirav Modi
कुंभमेळ्यातील आणखी एका आखाडा प्रमुखाला कोरोनाची बाधा; याआधी एकाचा मृत्यू

ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी त्याच्या प्रत्यार्पणाला आज मंजुरी दिली. मोदीला भारतात आणण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याचा भाऊ निहाल मोदीवर ‘सीबीआय’ने लक्ष केंद्रित केले होते.

मोदीच्या वकिलांच्या गटाचे नेतृत्व बॅरिस्टर क्लेअर मॉन्टोग्मेरी या करीत होत्या. भारताच्या आरोपाच्या संरक्षणार्थ त्यांनी भक्कम बचाव फळी न्यायालयात उभी केली होती. याशिवाय कोरोनाव्हायरसच्या साथीमुळेही ‘सीबीआय’पुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आर्थर रोड कारागृहात राहणार हिरे व्यापारी

भारतात आणल्यावर नीरव मोदी याचा मुक्काम कोणत्या तुरुंगात आणि किती क्रमांकाच्या कोठडीत असेल, हे पूर्वीच ठरविण्यात आले आहे. त्याला गजाआड करण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात एक विशेष कोठडी खोली तयार ठेवली आहे. कोठडी क्र. १२ मधील सध्याच्या तीन खोल्यांपैकी एकीत नीरव मोदीला ठेवले जाईल. उच्च सुरक्षा व्यवस्था असलेली ही १२ क्रमांकाची कोठडी आहे.

Nirav Modi
''खरंच काळजी असेल तर''; पुनावालांची बायडेन यांना हात जोडून विनंती

असा झाला ‘पीएनबी’ गैरव्यवहार

- नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्या परदेशातील कंपन्यांकडून कच्चे हिरे घेत.

- कच्चे हिरे विक्रेत्यांचे भारतीय बँकांच्या विदेशातील शाखांमध्ये खाती होती.

- पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदी अनधिकृतरीत्या ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ (एलओयू- कर्जाची हमी)’ मिळवीत असे

- ‘एलओयू’द्वारे मोदी भारतीय बँकांच्या विदेश शाखांतून अल्प मुदतीचे कर्ज घेऊन विक्रेत्यांची रक्कम विदेशी चलनात चुकती करत होता

- बँकेच्या केंद्रीकृत यंत्रणेत (सीबीएस) मध्ये अशा अनधिकृत व्यवहारांची नोंद न होता ती जागतिक वित्तीय व्यवहारासाठी सूचनेची सॉफ्टवेअर प्रणाली म्हणजेच ‘स्विफ्ट’मध्ये केली जात असे

-‘एलओयू’मार्फत होणाऱ्या पतपुरवठा अल्पमुदतीचा आणि ९० दिवसांमध्ये त्याची परतफेड व्हायला हवी या ‘आरबीआय’च्या नियमाचा भंग करीत भारतीय बँकांच्या विदेश शाखांनीही वर्षभराच्या कालावधीसाठी नीरव मोदीला कर्ज दिल्याचेही उघडकीस

- अनधिकृत ‘एलओयू’द्वारे ११ हजार ४०० रुपयांचा गैरव्यवहार

न्यायालयाची निरीक्षणे

नीरव मोदी याच्याबरोबर त्याचा मामा मेहूल चोक्सी याचे नावही या आर्थिक गैरव्यवहारात होते. पण जिल्हा न्यायाधीश सॅम्युअल गुन्झी यांनी केवळ मोदी हाच भारतीय न्यायालयाला उत्तर देण्यास बांधिल असेल, असे निर्देश दिले होते. मोदी याच्या खटल्याची भारतात निष्पक्ष सुनावणी होणार नाही, असे म्हणण्यास कोणताही पुरावा नाही, असे न्यायाधीश म्हणाले. शिवाय भारतात त्याला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्याबाबत मानवी हक्क संघटनांनी उपस्थित केलेला मुद्दाही त्यांनी फेटाळून लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com