Airbag Policy : एअर बॅगची किंमत किती? कार मालकांना नितीन गडकरींचे उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari Latest News

Airbag Policy : एअर बॅगची किंमत किती? कार मालकांना नितीन गडकरींचे उत्तर

Airbag Policy News नवी दिल्ली : सरकारच्या ‘एअरबॅग पॉलिसी’चा (Air Bag) परिणाम छोट्या कारवर होऊ शकतो. प्रत्येक कारमध्ये ६ एअरबॅगच्या नियमामुळे मारुतीची परवडणारी हॅचबॅक सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर जाईल. यामुळे अल्टो, एस-प्रेसो, वॅगनआर, स्विफ्टसारख्या छोट्या बॅचबॅक बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. छोट्या कारच्या बेस व्हेरियंटमध्ये ६ एअरबॅग्ज बसवल्यास त्यांची किंमत ६० हजारांनी वाढेल, असे मारुतीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी जूनमध्ये म्हटले होते. आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकसभेत एअरबॅगची किंमत सांगितली आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या वेळी कारमधील एअरबॅगचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी केंद्रीय मंत्र्याला विचारले होते की, सरकारने निर्णय घेतला आहे की प्रत्येक कारमध्ये किमान ६ एअरबॅग अनिवार्य केल्या जातील. त्याच्या मसुदा, अधिसूचनेची तारीख यावर्षी ऑक्टोबरची आहे. परंतु, ती अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. त्याची अधिसूचना कधी येणार, जेणेकरून कंपन्यांसाठी ‘एअरबॅग’चे धोरण लागू करता येईल.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा, मंत्रिमंडळ विस्ताराचे कारण केले स्पष्ट; म्हणाले...

या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले (Nitin Gadkari) की, ‘एअर बॅगची (Air Bag) किंमत फक्त ८०० रुपये आहे. सरकार ६ एअरबॅगच्या प्रस्तावावर विचार करीत आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच होणार आहे. कार कंपन्यांसाठी ते केव्हा बंधनकारक असेल याची टाइमलाइन त्यांनी स्पष्ट केली नाही. देशात दरवर्षी पाच लाखांपर्यंत रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये १.५ लाख लोकांचा जीव जातो. सध्या, कारमधील ड्रायव्हर आणि पुढच्या सीटच्या प्रवाशाला एअरबॅग आवश्यक आहे. मागे बसलेल्या लोकांसाठी एअरबॅगचा नियम नाही. मात्र, सरकारने सर्व प्रवाशांसाठी एअरबॅग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.’

कंपनी १५ हजार का आकारते?

एका एअरबॅगची किंमत ८०० रुपये असताना कंपनी त्यावर १५ हजार रुपये का आकारत आहे. आरसी भार्गव यांच्या मते जर ६ एअरबॅग्ज बसवल्या गेल्या तर गाडीची किंमत ६० हजार रुपयांनी वाढेल. कारमध्ये आधीच २ एअरबॅग आहेत. म्हणजेच ४ एअरबॅग बसवण्याचा खर्च १५ हजार प्रति एअरबॅग या दराने ६० हजार असेल.

हेही वाचा: नवऱ्यासाठी हव्यात तीन तीन मुली; बायकोने स्वतः दिली जाहिरात

कंपनी ६० हजार का सांगतेय?

नितीन गडकरींच्या मते एअरबॅगची किंमत ८०० रुपये आहे. म्हणजेच ४ एअरबॅकची किंमत ३,२०० रुपये आहे. आता असे गृहीत धरा की एअरबॅगसह काही सेन्सर्स, सपोर्टिंग ऍक्सेसरीज देखील स्थापित केले जातील. मग एअरबॅगची किंमत सुमारे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढू शकते. म्हणजेच एअरबॅगची किंमत १,३०० रुपये असू शकते. म्हणजेच ४ एअरबॅगची किंमत ५,२०० रुपये आहे. मग कंपनी ६० हजार रुपये का सांगत आहे.

Web Title: Nitin Gadkari Air Bag Cost Car Owners

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nitin Gadkaricar
go to top