"नितीश कुमारांवर कोणीही नाराज नाही, शरद यादव नाराज ही अफवा"

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

शरद यादव यांच्या बाजूने अद्याप कोणतेही विधान वा निवेदन करण्यात आलेले नाही. ते नाराज आहेत ही अफवा आहे.

- अन्वर

नवी दिल्ली : नितीश कुमार यांच्यावर संयुक्त जनता दलाचा (जेडीयू) कोणताही नेता नाराज नाही, असे सांगत खासदार अली अन्वर यांनी ते स्वतः आणि शरद यादव हे नाराज असल्याच्या चर्चेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. यादव नाराज आहेत ही अफवा आहे असेही त्यांनी सांगितले. 

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या या निर्णयाला संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) खासदार अली अन्वर यांनी गुरुवारी जाहीरपणे विरोध दर्शवला होता. "माझा अंतरात्मा नितीश कुमार यांच्या या निर्णयाचे समर्थन करत नाही. मी पक्षाच्या बैठकीत या मुद्द्यावर माझी म्हणणे मांडणार आहे," असे अली अन्वर म्हणाले होते. 

अन्वर यांनी सांगितले की, काल केलेले विधान म्हणजे नितीश कुमार यांच्याविरोधातील बंड नव्हते. परंतु, पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत याबद्दल मी बोलणार आहे. 
शरद यादव यांच्या भूमिकेबद्दल बोलताना अन्वर म्हणाले, "शरद यादव यांच्या बाजूने अद्याप कोणतेही विधान वा निवेदन करण्यात आलेले नाही. ते नाराज आहेत ही अफवा आहे."

नितीश कुमार यांचा शपथविधी समारंभ पाटणा येथे पार पडत असताना शरद यादव हे राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीला गेले होते. राहुल गांधी यांनी नितीश यांच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर काही वेळातच शरद यादव यांनी त्यांची भेट घेतली.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्यांसाठी क्लिक करा :

जेफ बेझोस ठरले जगात सर्वांत श्रीमंत 
कर्जमाफी की कर्जवसुली?
पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यांनाच अधिक धनलाभ 
स्वार्थी नितीश कुमार यांनी दगा दिला- राहुल गांधी 
टोमॅटो विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट 
पुनर्गठित कर्जदारांनाही माफी - मुख्यमंत्री
लालूप्रसाद, राहुल यांना योग्य वेळी उत्तर देऊ: नितीशकुमार
राज्यातील 82 पेट्रोल पंपांत मापात पाप 
परराष्ट्रमंत्र्यांना खोटे ठरविण्याचा काँग्रेसचा अजेंडा: सुषमा स्वराज
मुजोर बॅंक अधिकाऱ्यांना धडा शिकवा - सुनील तटकरे 
काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात
महिला तस्करी रोखावीच लागेल - मुख्यमंत्री

Web Title: nitish kumar news MP Ali Anwar Sharad Yadav JDU bjp alliance