देशात लागू करणार एनआरसी, कोणाला घाबरण्याची गरज नाही : शहा

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

राज्यसभेत आज (बुधवार) काश्मीरमधील परिस्थितीवरून व एनआरसीच्या मुद्द्यांवरून अमित शहा यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी शहा यांनी धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव केल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विरोधी पक्षांकडून राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देशभरात एनआरसी लागू करण्यात येईल व आधारच्या आधारे नागरिकाची ओळख करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. त्यांनी कोणत्याही धर्माच्या नागरिकांना घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Exclusive : शरद पवारांनी भेटीदरम्यान मोदींना दिले पत्र; पाहा...

राज्यसभेत आज (बुधवार) काश्मीरमधील परिस्थितीवरून व एनआरसीच्या मुद्द्यांवरून अमित शहा यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी शहा यांनी धर्माच्या आधारे एनआरसीमध्ये भेदभाव केल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. 

संजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...

अमित शहा म्हणाले, की कोणत्याही धर्माच्या नागरिकांना यावरून घाबरण्याचे कारण नाही. ही एक प्रक्रिया असून, याद्वारे देशातील सर्व नागरिक एनआरसी यादीत सहभागी होऊ शकणार आहेत. एनआरसीमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. एखाद्या धर्माच्या नागरिकाला एनआरसीमध्ये सहभागी केले जाणार नाही, असे काही नाही. कोणताही धर्म असलेल्या नागरिकांना यामध्ये सहभागी केले जाईल. एनआरसी आणि नागरिकता संशोधन विधेयक या वेगळ्या प्रक्रिया आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NRC Will Cover Everybody Across India, Irrespective Of Religion says Amit Shah