
Video: आजीबाईचा रावडी डान्स पाहाल तर थक्क व्हाल, पहा व्हिडीओ
पुष्पा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. त्याची गाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. आजही पुष्पा चित्रपटाच्या गाण्याची भूरळ सर्वत्र पहायला मिळते. अशातच एका आजीबाईचा अंगावर काटा आणणारा झकास डान्स सध्या व्हायरल होतोय. आजीबाईचा डान्स पाहून कुणालाही पाहातच रहावे असे वाटणार. सध्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (old lady dance on pushpa movie song goes viral on social media)
हेही वाचा: २ ते १८ वयोगटातील मुलांवर बूस्टर डोसची चाचणीची DCGI कडे मागितली परवानगी
या व्हिडीओमध्ये ही आजीबाई ‘सामी-सामी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ज्या जोशात आजीबाई डान्स करत आहे, तिचा डान्स पाहून थक्क होणार. अगदी तरुणाईला लाजवेल, असा डान्स आजीबाई करत आहे.
हेही वाचा: अहमदाबाद नामांतर : सुब्रमण्यम स्वामींनी मोदींना खडसावले, केली मुख्यमंत्री असतानाची आठवण
सध्या हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. मात्र सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर आजीबाईच्या डान्सचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहे.
Web Title: Old Lady Dance On Pushpa Movie Song Goes Viral On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..