

Petrol Diesel Stock Update
esakal
Petroleum companies clarification : देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने तातडीने स्पष्टीकरण देत या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये किंवा अनावश्यक खरेदी करू नये, असे आवाहन कंपनीने केले आहे.