RDX Seized : पंजाब हादरवण्याचा कट फसला; ४ किलो आरडीएक्स जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plot to shake Punjab failed

पंजाब हादरवण्याचा कट फसला; ४ किलो आरडीएक्स जप्त

पंजाबच्या तरणतारण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आरडीएक्स जप्त (RDX seized) केले आहे. यामुळे पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा कट फसला आहे. स्फोटके एका गोणीत लपवून ठेवली होती. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Plot to shake Punjab failed)

तरणतारण पोलिसांनी एका दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोघांकडून सुमारे चार किलो आरडीएक्स जप्त केले आहे. आरडीएक्स एका गोणीत लपवून ठेवले होते. नौशहर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तरणतारण पोलिस अटक आरोपींची चौकशी करीत आहेत. सुगावा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुरुवारी कर्नाल पोलिसांनी अटक केलेल्या चार बीकेआय कुरिअरने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

आरडीएक्सच्या (RDX seized) माध्यमातून पंजाबला हादरा देण्याचे मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नालमध्ये पकडलेल्या चार दहशतवाद्यांशी आरडीएक्स लपवण्याच्या वायरी जोडल्या जात आहेत. शत्रू देश पाकिस्तान आता भारत-पाकिस्तानमधील तरणतारण जिल्ह्याचा वापर देशविरोधी कारवायांसाठी करीत आहे.

आयएसआयच्या (ISI) माध्यमातून तिथे बसलेला रिंडा जिल्हा तरणतारणच्या तरुणांना दहशतवादी बनवण्यात गुंतला आहे. अलीकडे अनेक दहशतवादी पोलिसांनी पकडले आहेत. चौकशीत मोठा कट उधळून (RDX seized) लावला. हे आरडीएक्सही रिंडाने ड्रोनद्वारे भारतात पाठवले होते. सध्या गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या आरडीएक्सच्या वायर्स कर्नालमध्ये पकडलेल्या चार दहशतवाद्यांशी जोडल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हा तरणतारणचे पोलिस त्यांना केव्हाही प्रॉडक्शन वॉरंटवर आणू शकतात. सध्या अटक करण्यात आलेला कथित दहशतवादी हरयाणातील कर्नाल जिल्ह्यातील विशेष पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना सुमारे दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :PunjabCrime News