
देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आज हयात असते तर त्यांना भारताचा अभिमान वाटला असता. संकटाच्या काळामध्येही भारत जगाच्या मदतीला धावून गेला असून कोरोना महामारीच्या काळामध्ये तो अन्य देशांना लशींचा पुरवठा करतो आहे.
कोलकता - देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आज हयात असते तर त्यांना भारताचा अभिमान वाटला असता. संकटाच्या काळामध्येही भारत जगाच्या मदतीला धावून गेला असून कोरोना महामारीच्या काळामध्ये तो अन्य देशांना लशींचा पुरवठा करतो आहे. भारताचे हे काम पाहून नेताजींचा ऊर अभिमानाने भरून आला असता, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मोदींच्या हस्ते यावेळी नेताजींना अभिवादन म्हणून विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे देखील अनावरण करण्यात आले. मोदी म्हणाले, ‘‘आजच्या दिवशी केवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला नव्हता तर भारताचा आत्मसन्मान जन्माला आला होता. याच नेताजींना जगाच्या महासत्तेला ठणकावून सांगितले होते की मी स्वातंत्र्य मागणार नाही तर ते हिसकावून घेईल.’’
सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीचं नुकसान किती? ते राज-उद्धव आणि मोदी-ममतादीदी एका स्टेजवर
मोदी म्हणाले की, नेताजींचे नाव घेताच ऊर्जा संचारते. तसंच पश्चिम बंगालने देशाला अनेक नररत्ने दिली. येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांनी नेताजींचे स्मरण ठेवावे. संकटाच्या काळात नेताजी प्रेरणास्थान ठरतात. आता भारताला रोखणारी ताकद जगामध्ये नाही असंही मोदींनी सांगितलं. तसंच शोनार बांगला ही सर्वांत मोठी प्रेरणा असल्याचंही मोदी म्हणाले. आत्मनिर्भरतेचे मूळ नेताजींच्या शिकवणीत आहे असं मोदींनी सांगितलं.
राजपथावर 'शिल्का' गन ऑपरेट करणार प्रिती; संधीबद्दल म्हणाली, महिला म्हणून नव्हे तर..
पंतप्रधान मोदींनी दिवसभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर नॅशनल लायब्ररीमध्ये त्यांनी नेताजींना अभिवादनही केलं. याशिवाय आझद हिंद सेनेतील सदस्यांचा गौरवही करण्यात आला. त्यानंतर व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम जवळपास तीन तास सुरु होता.
Edited By - Prashant Patil