esakal | मोदींनी चहा विकलेल्या दुकानाविषयी सरकारचा मोठा निर्णय; काय होणार दुकानाचे?
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींनी चहा विकलेल्या दुकानाविषयी सरकारचा मोठा निर्णय; काय होणार दुकानाचे?

एकेकाळी वडनगरनमध्ये रेल्वे स्टेशनवर चहा विकलेले नरेंद्र मोदी सध्या देशाचे पंतप्रधान आहेत. पण, त्यांच्या संघर्षाचा काळ आजही चर्चेत असतो. त्यामुळेच आता गुजरात सरकार एक वेगळा निर्णय घेत आहे. वडनगर येथे ज्या ठिकाणाहून नरेंद्र मोदी यांनी चहा विक्रीचा व्यवसाय केला होता, दे दुकान आता टुरिस्ट स्पॉट म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

मोदींनी चहा विकलेल्या दुकानाविषयी सरकारचा मोठा निर्णय; काय होणार दुकानाचे?

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय असते. मग, तो मॅन व्हर्सेस वाईल्डचा एपिसोड असो किंवा त्यांच्या पूर्वीश्रमीचे आयुष्य असो. प्रत्येक गोष्ट कुतुहल निर्माण करणारी असते. एकेकाळी वडनगरनमध्ये रेल्वे स्टेशनवर चहा विकलेले नरेंद्र मोदी सध्या देशाचे पंतप्रधान आहेत. पण, त्यांच्या संघर्षाचा काळ आजही चर्चेत असतो. त्यामुळेच आता गुजरात सरकार एक वेगळा निर्णय घेत आहे. वडनगर येथे ज्या ठिकाणाहून नरेंद्र मोदी यांनी चहा विक्रीचा व्यवसाय केला होता, दे दुकान आता टुरिस्ट स्पॉट म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

उदयनराजेंचं ठरलंय, मावळा मन वळवण्यात अपयशी

Video : अंतराळवीर उतरला चंद्रावर आणि बाजून गेली रिक्षा

पर्यटन मंत्र्यांनी दिली भेट
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याच मंत्री प्रल्हाद पटेल यांनी नुकतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जन्मभूमी गुजरातला भेट दिली. त्यात त्यांनी पर्टनासाठी विकसित करता येऊ शकतील, अशा ठिकाणांना भेटी दिल्या. मंत्री पटेल यांनी वडनगरलाही भेट दिली आणि तेथील रेल्वे स्टेशनवरही त्यांनी पाहणी केली. तेथील प्लॅटफॉर्मवर आजही एक दुकान आहे. त्या दुकानातून एकेकाळी नरेंद्र मोदी चहाची विक्री करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बऱ्याचवेळा त्यांच्या भाषणात याचा उल्लेख केला आहे. 

अभिनंदन वर्धमान पुन्हा झेपावले ''त्या'' दिशेने!

मणिशंकर अय्यर आणि मोदींचा चहा
2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यावेळचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची चहा विक्रीच्या किस्स्यावरून खिल्ली उडवली होती. अय्यर म्हणाले होते की, 21व्या शतकात नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात चहा विकावा. अय्यर यांच्या या वक्तव्याचा भाजपने फायदा उठवला आणि संपूर्ण निवडणूक चहा या विषयावर फिरवली. चाय पे चर्चा, सारखे कार्यक्रम घेऊन भाजपने मोदींसारखा एकेकाळी चहा विकणारा माणूस देशाचां पंतप्रधान होऊ शकतो. हीच भारतीय लोकशाहीची ताकद असल्याचे भाजपनं म्हटलं होतं.  

कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणी 600 तक्रारी

मोदींचे दुकान जपणार
दरम्यान, मंत्री पटेल यांनी मोदींनी एकेकाळी चहा विकलेले दुकान पाहिले. लोखंडी पत्र्याचे हे दुकान खालून गंजल्याचे दिसत आहे. हे दुकान आणि गंजण्यापासून वाचविण्यासाठी काचेने झाकले जाणार आहे. पटेल म्हणाले, 'या दुकानाची वास्तव परिस्थिती अशीच जपायला हवी आणि ती जपली जाईल.' पटेल यांनी वडनगरसह इतर ऐतिहासिक ठिकाणांनाही भेट दिली आहे.

loading image
go to top