Crime : मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसवर पोलिसाची आत्महत्या

COP-Suicide
COP-Suicide

हैदराबाद : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या फार्महाउसवर तैनात असलेल्या पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन बुधवारी (ता.16) आत्महत्या केली.

ए. व्यंकटेश्‍वरलू (वय 38) असे त्याचे नाव असून, तो तेलंगणच्या विशेष पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होता. ईरावेल्ली येथे असलेल्या राव यांच्या फार्महाउसवर ही घटना घडली. 

व्यंकटेश्‍वरलू याला मद्याचे व्यसन होते. त्यासाठी त्याला काही दिवस व्यसनमुक्ती केंद्रातही ठेवण्यात आले होते. तेथून आल्यावर त्याला फार्महाउसवर तैनात करण्यात आले होते. मात्र, तो परत मद्याच्या आहारी गेला आणि ड्यूटीवर अनुपस्थित राहू लागला होता.

त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला समजही दिली होती. त्याच्या पत्नीने विनंती केल्यावर त्याला पुन्हा फार्महाउसवर नेमण्यात आले होते, अशी माहिती सिद्दीपेठचे पोलिस आयुक्त डी. जोएल डेव्हिस यांनी दिली.

आज कर्तव्यावर असताना व्यंकटेश्‍वरलूने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. व्यंकटेश्‍वरलूच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com